तिसन्या दिवशही स्वयंपाकी महिलांचे उपोषण शुरू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : स्वयंपाकी महिलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून शाळा व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ गावकरी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदर्श विद्यालय सिहोरा येथे मागील २२ वर्षापासून मध्यान्ह भोजन तयार करणाºया स्वयंपाकी महिलांना साहित्य चोरीच्या खोट्या आरोपात कामावरून काढण्यात आले आहे.

विद्यालय व व्यवस्थापन मंडळाचे विरोधात गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्वयंपाकी महिलांनी विद्यालयाच्या गेटसमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. कामावर पूर्ववत घेण्यात यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे . आदर्श विद्यालय सिहोरा येथे २२ वर्षांपासून स्वयंपाकी महिला म्हणून कार्यरत असणाºया उषा वाघाडे, लक्ष्मी सोनकुसरे आणि सुनीता वघारे या तिन्ही महिलांना मध्यान्ह भोजनाचे साहित्य चोरीच्या खोट्या आरोपावरून विद्यालय व्यवस्थापन मंडळाने कामावरून काढले आहे. त्यांना कामावरून काढण्यात आल्यानंतर रिक्त पदांवर अन्य महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामावरून काढतांना या महिलांना व्यवस्थापन मंडळाने साधे नोटीसही दिले नाही.

याशिवाय साहित्य चोरीच्या आरोपाखाली पोलिस ठाण्यात तक्रारही दिली नाही.तसेच चोरी केल्याचा यांच्याकडे कोणताच पुरावा नाही. त्यांचेवर लावलेले आरोप खोटे ,बिन बुडाचे, असत्य व तथ्यहीन आहेत. मनमर्जीने निर्णय घेऊन अन्याय करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तडजोडीतून मार्गकाढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतु प्राचार्य या महिलांना पूर्ववत कामावर घेणार नाही. अशी ताठर भूमिका घेवुन आहे. विद्यालय ते पोलिस स्टेशन, असा प्रवास चर्चा बैठकीने घेतला आहे. परंतु तोडगा निघाला नाही. व्यवस्थापन मंडळ काहीच ऐकायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. आदर्श विद्यालयाचा संचालक मंडळ हा सुद्धा अल्पमतात असल्याचे सांगितले जाते . सिहोरा हे गाव तुमसर तालुक्याची व्यापार नगरी व राजकारणाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात आहे. परंतु या बालेकिल्लाला दृष्ट कशी लागली की २२ वर्षापासून स्वयंपाकी म्हणून काम करणाºया महिलानवर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने अन्याय होत आहे. आणी म्हणून स्वयंपाकी महिलांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या समोरच बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषण मंडपात सुनीता वघारे आणि उषा वाघाडे या दोन्ही स्वयंपाकी महिला उपोषणाला बसल्या आहेत. कामावर पूर्ववत घेणे, या प्रमुख मागणीसाठी सुरु असणाºया महिलांच्या आमरण उपोषणाला शापोआ युनियन व भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटकचे जिल्हा सहसचिव कॉ. रामलाल बिसेन , भारतीय किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल ठवकर ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती अब्दुल कलाम शेख यांनी पाठिंबा दिला आहे. तर सरपंच रंजूताई तुरकर, उपसरपंच सलाम शेख, कादर अन्सारी, दिनेश तुरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. आता जिल्हा प्रशासनाचा निर्णय व रस्ता रोको आंदोलनाच्या भुमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर सदर प्रकरण आता जिल्ह्यात चांगलेच गजबजणार का ? हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *