रखडलेल्या पुलाचे काम पुर्ण करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सालेकसा : नागरिकांच्या सुविधेसाठी येथील वाघ नदीवर पूल मंजूर केरण्यात आले. निधी उपलब्ध करून दोनवषार्पुवी बांधकामाला सुरवात झाली. आज स्थितीत पुलाचे काम रखडून आहे. जनतेला अडचनींचा सामना करावा लागतो. प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी निमार्णाधिन बांधकामस्थळी वाघ नदीत २० फेब्रुवारी रोजी अर्धनग्न आंदोलन केले. यानंतर प्रशासन खळबडून जोगे झाले. २४ फेब्रुवारीपासून कामाला सुरवात करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली. तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठ्या पूलाची मागणी ७० वर्षापासून करणे सुरू होते. अखेर पुल मंजूर झाला, दोना बांधकामाचे भूमिपूजन झाले. खोदकामात दगड लागल्याचे कारण देत दोनवषार्पासून काम अर्धवट आहे. यामूळे पुवीर्चा रस्ता बंद झाला.

परिणामी नागरीकांना १ किमी अंतर कापण्यासाठी १५ किमीची पायपीट करावी लागते.अनेकदा नागरिक जीव मुठीत घालून नदी प्रवाहातून वाट काढतात. काम पुर्ण करण्याच्या मागणीसाठी अनेकदा नागरिकांनी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. याचा काही एक लाभ झाला नाही. अखेर संबंधित विभाग, शासन, प्रशासनाला जागवण्यासाठी आज मंगळवारी अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भजेपार, बोदलबोडीसह परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले. आंदोलनाची तीव्रता पाहत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता उसेंडी, उपअभियंता मानकर आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलकांची समजूत काढत २४ फेब्रुवारी पूर्वी काम सुरू करण्याची लिखीत ग्वाही दिली. दरम्यान यंत्र सामुग्रीही पोहचवली. त्यानंतर आंदोलक नदीपात्रातून बाहेर येत आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्र वंदना गात आंदोलनाची सांगता झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *