अडकविण्यासाठी पोलिसांनी ट्रॅक्टरमध्ये मजुरांद्वारे भरली रेती!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शेतातील धानाची पोती आणण्यासाठी जाणाºया रिकाम्या ट्रॅक्टरला पोलिसांनी अडविले. या ट्रॅक्टरने रेती चोरी करतोस असे सांगून पोलिसांनी बळाचा वापर केला. त्या रिकाम्या ट्रॅक्टरमध्ये मजुरांकडून रेती भरली. रेतीचा भरलेला ट्रॅक्टर मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. तसेच नाहक गुन्हाही दाखल केला असा आरोप पत्रकार परिषदेत सचिन डोंगरे यांनी केला. महालगाव-मोरगावच्या आमराईत एक दरगा आहे. त्या दर्ग्याशेजारी सचिन डोंगरे यांची शेतजमीन आहे. शेतावर असेलेली धानाची रास आणण्यासाठी सचिन डोंगरे यांचे ट्रॅक्टर रात्री गेला होता. दरम्यान त्या ठिकाणी दोन पोलिस उभे होते. दर्ग्याशेजारच्या रेतीच्या ठिय्या वरून त्याच ठिकाणी दोन ट्रॅक्टर रेती भरत होते. त्या भरल्या ट्रॅक्टरला पोलिसांनी जावू दिले. पोलिसांनी विचारपूस करून त्यांच्या गाड्या सोडल्या तसेच नदीत काही ट्रॅक्टर रेती भरत होते. ते दोन ट्रॅक्टर गेल्यावर माझी खाली असलेला ट्रॅक्टर पोलिसांनी अडवला. बाजूला रेतीचे ट्रॅक्टर भरले आहेत ते बघा असे पोलिसांना सांगताच त्यांनी दम दिला. दबाव व बळजोरीने हमालांकडून दर्ग्याजवळची रेती ट्रॅक्टरमध्ये भरून घेतली. त्यानंतर नदीतून रेती काढली हे दाखविण्यासाठी त्या रेतीवर मोटारपंप सुरू करून पोलिसांनी पाइपने पाणी मारले. त्यावेळी ट्रॅक्टर चालक दिनेश झंझाड यांचा पोलिसांनी मोबाईल सुध्दाहिसकावून घेतला. रात्रीच रेती भरलेला ट्रॅक्टर मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आला. ट्रॅक्टर मालक घटनास्थानावर नव्हता तरी चालक म्हणून सचिन डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा हा बनावट प्रकरण पोलिसांनी करून पोलिसांनी नाहक गुन्हा दाखल केल्याचे सचिन डोंगरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *