महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी शहरातील मुख्य स्मारक समितीला भेट देत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत आहोत. आज आपण केवळ महामानवामुळे जगामध्ये ताठ मानाने जगत आहोत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वसामान्यांना अधिकार दिले, जगण्याचे हक्क दिले. त्या अधिकारांमुळेच प्रत्येक नागरिकांना समान दर्जा प्राप्त झाला आहे. लिखित स्वरूप असलेले भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट ग्रंथाच्या यादीत आहे. ते फक्त आंबेडकरांमुळेच शक्य होऊ शकले. अनेक लोकांना मोठ्या पदावर जाण्याची संधी संविधानाने मिळाली. आंबेडकरांनी या देशाला, समाजाला मानवतेचा संदेश दिला.

सर्वसामान्य लोकही त्यांच्या विचारांचा त्यांचा केंद्रबिंदू होता. तळागाळातल्या लोकांना जगण्याचं बळ दिलं, वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिलं. दलितांच्या मनात रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली. आत्मविश्वास दिला. अश्या महामानवाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्मारक समितीत असलेल्या भव्य प्रतिमेला मल्यारपण करण्यात आले. दरम्यान जयघोष करत बाबासाहेबांना मानवंदना वाहण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी उपाध्यक्ष गिता कोंडेवार, मुन्ना पुंडे, तुमसर शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रीती मलेवार, युवा मोर्चा अध्यक्ष पवन पाटिल, सौ.कल्याणीभुरे, कुंदा वैद्य, सचिन बोपचे, अर्चना भुरे, राजकुमार मरठे, शोभा लांजेवार, संदीप कटकवार, नितिन धांडे, स्वप्निल मनगटे, बालुभाऊ माटे, कृष्णा पाटिल, शीतल कालबांडे, अदिती कालबांडे, उज्ज्वला मेश्राम, शालिनी कटकवार, ममता गजभिये, नितिन पटले, आदींसह भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.