नवजीवन सीबीएसई मध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमन यांच्या जंयती प्रित्यार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकिय अधिकारी विनोद किरपान व सतिश गोटेफोडे यांच्या मार्गदर्शनात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, विद्यार्थी विज्ञानाकडे प्रेरित व्हावे, सर्वांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणिव व्हावी तसेच विज्ञानाचे अनन्य साधारण महत्व समजावे या हेतूने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वर्ग ५ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मॉडेल्सची संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद कंरजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव सौ. वृंदाताई करंजेकर, प्राचार्य तसेच नवजीवन सीबीएसई चे शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रशंसा व कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीत तयार केलेल्या मॉडेल्साठी प्राचार्य, पर्यवेक्षिका, वरिष्ठ शिक्षिका, प्रशासकीय अधिकारी, विज्ञान विषयाचे शिक्षकगण यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *