एसटी बसच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : भरधाव वेगाने येणाºया एस टी बस ची मागेहून लागलेल्या धडकेत सायकल स्वार शेतकºयाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. देविदास एकनाथ मेंढे वय ५५ वर्ष, रा. कुंभली असे मृतकाचे नाव आहे. अपघाताच्या या घटनेनंतर कुंभली गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती साकोली पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार राजेश थोरात व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी एस टी बस चालकाच्या विरोधात गून्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार साकोली ते सानगडी मार्गावर कुंभली गावातील वामन भाणारकर यांच्या घराजवळून कुंभली निवासी देविदास एकनाथ मेंढे रात्री ८ वाजेच्या सुमारास सायकल ने कामे आटोपून आपल्या घरी परत होते.

या दरम्यान मागेहून येणाºया एस टी बस क्रमांक एम.एच.०७ सि – ९४४८ च्या बसचालक आरोपी ने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगाने, हयगयीने व लापरवाहीने चालवुन सायकल स्वार देविदास मेंढे यांना धडक दिली.या धडकेत देविदास मेंढे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोलीस निरीक्षक राजेश थोरात स. पो. निरीक्षक रेखलाल गौतम, पो. हवा. अमित वडेट्टीवार, कन्नाके व शिपाई बरीये यांनी घटनास्थळ गाठून ग्रामवासियांची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात केली. पोलिसांनी आरोपी एस टी बस चालक सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली निवासी शामराव धनभाते वय ४३ वर्ष विरोधात गून्हा दाखल केला आहे. पूढील तपास स.पो.नि संजय खोकले करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *