वैजेश्वर घाटावरील स्मशान भूमीतील समस्या सोडवा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी शहरात वैजेश्वर मंदिराच्यामागे मागे स्मशानभूमी (वैजेश्र्वर मोक्षधाम) असून तेथील समस्याबाबद व्यापारी असोसिएशन पवनी तर्फे निवेदन देण्यात आले. पवनी येथील मुख्य स्मशान भूमीत जाणारा रस्ता अतिशय अरुंद असून पावसाळ्यात चिखल साचलेला आहे.त्यामुळे नागरीकांना ये-जा करतांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर पुल छोटा व अरुंद आहे त्यामुळे मुख्य स्मशानभूमी पर्यंत बैलगाडी अथवा ट्रॅक्टर जावू शकत नाही.त्यामुळे लोकांना मयतीचे लाकडे उचलून न्यावे लागते.करीता सदर पुल मोठा व रुंद करण्यात यावा, उन्हाळयात अंतिम संस्कारसाठी येणाºया नागरीकांना भर उन्हात बसावे लागते तर पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात भिजत राहावे लागते.

त्यामुळे स्मशान भूमीत खालच्या बाजूला एक आणि वरच्या भागाला दुसरा सभागृह तयार करून नागरीकांचे संरक्षण करावे,स्मशानभूमीत असलेल्या नदीकाठावरील शिल्लक जागेचे सिमेंट काँक्रिटकरण करून लोकांना बसण्याकरीता व पायºयांचे बांधकाम करण्यात यावे तसेच अंतिम संस्कारासाठी आलेल्या आप्तस्वकीयांना मुखाग्नी पूर्वी आंघोळीची सुरक्षितता म्हणून लोखंडी पोल व साखळी लावण्यात यावी. नदी काठच्या दगडाची पीचींग किंवा संरक्षण भिंत निर्माण करण्यात यावी आणि स्मशान भूमीचे सौंदर्यीकरण करण्यात यावे आदि मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना व्यापारी असोसिएशन पवनीचे अध्यक्ष देवराज बावनकर, मार्गदर्शक लिलाधर मुंडले, मनोहर ढोमने, वैजेश्र्वर मंदिराचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाष्कर उरकुडकर, सचिव महादेव लिचडे ,कोषाध्यक्ष प्रकाश पोटफोडे, माजी नगरसेवक मनोज माळवी , व्यापारी असोसिएशनचे संचालक पंकज सावरबांधे, विनय राऊत, किशोर भांडारकर, विजय पाटील, धनराज रासेकर, लिलाधर

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *