गळफास घेऊन शेतकºयाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : गत काही दिवसांपासून अज्ञात कारणाने त्रस्त झालेल्या एका शेतकºयाने आपल्याच शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली ही घटना .२४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ . ३० वाजता सुमारास तालुक्यातील कुडेगाव शेतशिवारात घडली. या घटनेत तुलाराम ढोरे (५५) रा. कुडेगाव या शेतकºयांचा मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांनुसार, या घटनेतील पीडित शेतकरी गत काही वर्षांपासून शेतीसह साऊंड सर्व्हिस ( सजावटीचा) व्यवसाय करत आहे. व्यवसायाच्या आधारे पीडित शेतकरी कुटुंबाची आर्थिक प्रगती झाल्याचीही माहिती देण्यात आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या घटनेत मृत्यूझालेल्या शेतकºयांचे अज्ञात कारणामुळे चिंतेत राहत असल्याची चर्चा आहे.

त्याअंतर्गत कुटुंबीयांना न सांगता पीडित शेतकºयाने सायंकाळी घराबाहेर पडून आपल्या मालकीच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडालानायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पीडित शेतकरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त करत पीडितेचा शोध सुरू केला. यावेळी पीडित शेतकरी आपल्याच शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, पोलीस हवालदार विलास मातेरे, संदीप बावनकुळे, मिलिंद बोरकर, उमेश शिवणकर आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी आक- स्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *