मनरेगातून रोजगार हे गरिबांच्या हक्काचे साधन- नागपुरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून देणारी योजना आहे. ग्रामीण भागाला समृद्ध करणारी योजना असून ख-या अर्थाने ते विकासाचे साधन आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरा व मोहरा बदलण्यास मदत होते. बेरोजगारांची भटकंती होणार नाही, मागेल त्याला काम मिळते असे प्रतिपादन उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी कले. मनरेगा अंतर्गत सिलेगाव येथे सुरू असलेल्या कामावरच पंचायत समिती तुमसरचे उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी १३ जून रोजी आपला वाढदिवस मजुरांसोबत साजरा केला.

यावेळी सिलेगावचे सरपंच यशवंत उपरीकर, उपसरपंच सुजित पेरे, रोजगार सेवक महादेव गौतम, ग्रामपंचायत सदस्य हरिचंद खरवडे, जितू गौतम, युवक येळे, ललिता आमकर, ममिता पडारे, शालू पवारे, कांता नान्हे, आनंदा पटले, संजय पवारे, सरिता गौतम, पूजा पेरे, उर्मिला पारधी, खुमेश्वरी गौतम, शिवशंकर नेवारे, तुषार रहांगडाले यांचेसह अनेक मजूर उपस्थित होते. प्रसंगी उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी मजूरांना अल्पोहाराचे वाटप केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *