अधिकारी आणि कर्मचारी पदोन्नती स्थानांतरण सेवानिवृत्ती निरोप कार्यक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी: येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पदोन्नती स्थानांतरण व सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम शुक्रवार दि.९ जून २०२३ ला सायंकाळी ६ वाजता सामान्य आस्थापना व तलाठी आस्थापना येथील कार्यरत अधिकारी कर्मचा-यांच्या वतीने शुक्रवार दि.९ जून २०२३ ला सायंकाळी ६ वाजता नवीन तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार सुखदेव चांदेवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार विजय बोरकर, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, सिराज शेख व सत्कारमूर्ती नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, मोरेश्वर हुकरे, अव्वल कारकून आनंद हट्टेवार, शिल्पा डोंगरे, महेश मानकर, कृष्णा आकरे, तलाठी पंकज घोडेस्वार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सामान्य आस्थापना व तलाठी आस्थापना येथील कार्यरत अधिकारी कर्मचा-यांच्या वतीने सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आले.

याप्रसंगी नायब नाझर महेंद्र लोहबरे, संतोष उईके, सागर बावरे, रामनारायण धकाते, चंद्रशेखर भोंगाडे, राहुल कांबळे, मंदा कावळे, अर्चना चिखले, संगिता ठोंबरे, नरेश चव्हाण, विनायक नंदनवार, तृप्ती पाटील, श्रद्धा उईके, गजानन नान्हे, शरद बोरकर, नारायण बावणे, शांताराम चकोले यांनी नवनियुक्त कोतवाल मोनिका परिहार धोप, किसन सावसाकडे आंधळगाव, सचिन बघेले सालई खुर्द, विशाखा ईश्वर ढबाले डोंगरगाव, सुनील गायधने कुशारी, आसिफ शेख बेटाळा, सुप्रिया मेहर शिवनी, अरविंद चोपकर कान्हळगाव, अस्मिता शेंडे वडेगाव, प्रणय बशीने खुटसावरी, राजेंद्र मेश्राम नेरी, दिनेश खंगार सातोना, पल्लवी निखील काळे मोहगावदेवी, शंकर बुटके देव्हाडा बुज, अमोल साठवणे करडी, हर्षाली निमजे मुंढरी बुज, बादल तिरपुडे पालोरा यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला मंडळ अधिकारी राजू मोहनकर, मुकेश मिश्रा, अनिल तागडे, विजय ब्राह्मणकर, सोनबा आहाके, तलाठी विद्या समरीत, पुनम मुंडे, रेखा कोकाटे, सरस्वता झाडे, कीर्ती अमृते, ओमप्रकाश भुरे, टिकाराम डोंगरवार, वैभव जाधव, चंदन नंदनवार प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रमाचे संचालन तलाठी निरंजना मदनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी जगदीश कुंभारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन सेलोकर, जयदेव मेश्राम, धनराज शेंडे, शालीक खांदाळे, छगन मेहर, क्रिष्णा भोयर, सुरेश बाणासुरे, गंगा मनोहर हेडाऊ आदींनी परिश्रम केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *