एनडीपीएस कायद्यान्वये युवकावर गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील जीर्ण पोलिस क्वार्टर मध्ये मातीची चीलममध्ये अमली पदाथार्चे सेवन करतांना मिळून आल्याची घटना बुधवारी (ता.२४) दुपारी ३:१५ वाजता दरम्यान उघडकीस आली. लाखनी पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला असून आरोपी युवकाचे नाव असद असलम आकबानी(२२) रा. लाखोरी रोड, लाखनी असे आहे. येथील पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदार वासंती बोरकर व पोलिस शिपाई संदेश कानतोडे पेट्रोलिंग करीत असताना १ युवक जीर्ण पोलिस क्वार्टर मध्ये संशयास्पद दिसल्याने जवळ जाऊन पाहिले असता मातीच्या चीलम मध्ये अमली पदार्थ गांजा भरून सेवन करतांना मिळून आल्याने एनडीपीएस कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून युवकाची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून १ मातीची चीलम, माचीस, सुती पांढºया रंगाच्या कापडाचा तुकडा व मातीच्या चीलम मधील अर्धवट जळालेली भुकटी मिळून आल्याने पंचासमक्ष सिलबंद करून जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त करून युवकाचे वैद्यकिय परीक्षण करून रक्ताचे नमुने प्राप्त केले. पोलिस शिपाई संदेश कानतोडे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी असद आकबानी यांचे विरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलिस शिपाई पंकज नीरगुळे तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *