कुशारीचे दिगंबर गभने ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या कार्यकारिणीची निवडणुक नुकतीच पार पडली. यात मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील रहिवासी ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दिगंबर रतीराम गभने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिगंबर रतीराम गभने यांची सलग दुसºयांदा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिगंबर रतीराम गभने यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनाची शाखा भंडारा जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात जवळपास ३०० ग्रामसेवक विविध ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. दर पाच वर्षांनी या ग्रामसेवकाची कार्यकारणीची निवड केली जाते. याच अनुषंगाने गुरुवार दि.९ मार्च २०२३ ला जिल्हा परिषद जवळील संघटनेच्या कार्यालयात कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.

यात सर्वानुमते ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दिगंबर रतीराम गभने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याआधीही दिगंबर रतीराम गभने हे जिल्हाध्यक्ष होते. दिगंबर रतीराम गभने यांनी संघटने मार्फत विविध आंदोलन,कार्यक्रम राबवून वेळेप्रसंगी कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. नेहमी चेहºयावर स्मित हास्य ठेवणारे दिगंबर रतीराम गभने हे अतिशय हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. ग्रामपंचायत कारभाराचा त्यांना दांडगा अनुभव आहे. ग्रामपंचायत संबंधित कायदे व नियमाचा त्यांना काटेकोरपणे अभ्यास आहे.

ज्या ग्रामपंचायतीमध्ये जातात त्या ग्रामपंचायतच्या कायापालट करण्याचे काम त्यांनी आतापर्यंत केले आहे. यामुळे दिगंबर रतीराम गभने यांची जिल्ह्यात एक आदर्श ग्रामपंचायत निमार्ता म्हणून ओळख आहे. ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदीदिगंबर रतीराम गभने यांची दुसºयांदा निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीत जिल्हाध्यक्षपदी दिगंबर रतीराम गभने (मोहाडी), उपाध्यक्ष संजय दलाल (लाखांदूर) महिला उपाध्यक्ष शिल्पा गाडेकर लेंडे, सरचिटणीस विश्वजीत उके( पवनी), कार्याध्यक्ष श्याम बिलवणे (भंडारा), कोषाध्यक्ष अश्विन डोहाळे (तुमसर), सहसचिव रवींद्र टोपरे (लाखनी), सल्लागार श्रीकांत हेडाऊ (लाखांदूर) जिल्हा संघटक मुकेश चवळे मोहाडी, महिला संघटक स्मिता ब्राह्मणकर, राज्य कौन्सिलर मंगला डहाळे भंडारा, लालचंद मेश्राम लाखनी, युवराज गभने तुमसर, नरेश शिवणकर साकोली, प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्याम वैद्य भंडारा व सहयोगी सदस्य म्हणून विजय बालचन्ने पवनी, महेंद्र हेमने लाखांदूर यांची निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास खोब्रागडे यांनी कामकाज सांभाळला. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते. मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील रहिवासी दिगंबर रतीराम गभने यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव सर्व स्तरावरून होत आहे.

विविध ग्रामपंचायतीचा कायापालट

मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील दिगंबर रतीराम गभने यांनी आपल्या सुनियोजित व सुव्यवस्थित कार्यशैलीमुळे अनेक ग्रामपंचायतीचा कायापालट केला आहे. यात मोहाडी तालुक्यातील पाचगाव, एकलारी, कांद्री, बीड व वरठीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सध्या ते वरठी येथे कार्यरत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांना प्रशिक्षित करून सुव्यवस्थित कारभाराचे धडे त्यांनी दिले आहे. यामुळे ग्रामपंचायत येणाºया कुठल्याही नागरिकांना कुठल्या प्रकारची अडचण होत नाही हे विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *