पुन्हा अवैध रेतीचे दोन टिप्पर जप्त

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाºया दोन टिप्परवर वरठी येथे कारवाई हे टिप्पर मोहाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. सोमवार दि.१३ मार्च २०२३ ला दोन टिप्पर जप्त करण्यात आले होते. मोहाडी तहसील कार्यालयात जेव्हापासून दीपक कारंडे रुजू झाले आहेत,तेंव्हापासून त्यांनी रेती माफियांची सळो की पळो सारखी स्थिती करून सोडली आहे. रेती व्यवसायिकांत त्यांची ओळख सिंघम म्हणून केली जाते. आतापर्यंत त्यांनी अवैध टिप्परवर कारवाई करून शासनाला कोट्यवधीच्या वर महसूल प्राप्त करून दिला आहे. तर दुसरीकडे एवढ्या कारवाया होऊनही रेती माफिया जुमानायला तयार नाहीत.

त्यामागे कारण ही तसेच आहे. पर्यावरण विभागाने परवानगी दिलीनसल्याने रेतिघाटांचे लिलाव झालेले नाहीत. परंतु कोणत्याही बांधकामाला रेतीची अत्यंत आवश्यकते असते. रेती सहज उपलब्ध होत नसल्याने रेतीचे भाव वाढलेले आहेत,त्याचा लाभ रेती माफियांना मिळत असल्याने कारवाई होत असली तरी ते आपला रेतीचा धंदा बंद करायला तयार नाहीत. गुप्त सुचनेच्या आधारे बुधवारी वरठी येथे दोन टिप्परणा थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे वैध परवाना नसल्याने टिप्पर क्रं.एम.एच.-३६/ए.ए.-१२१३ व एम.एच.४९/ए.टी.- ०१३० वर दंडात्मक कारवाई करून मोहाडी पोलीस ठाण्यात जमा करून ठेवण्यात आले आहे. हे टिप्पर सोनु गणवीर रा.दाभा व शुभम बनकर रा.नागपूर यांच्या मालकीचे आहेत. ही कारवाई तहसीलदार दीपक कारंडे,मंडळ अधिकारी ब्राम्हणकर, मोहरकर, कोतवाल चंदन नंदनवार यांच्या चमूने केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.