उड्डाणपुलावरुन कोसळला कंटेनर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी: भरधाव कंटेनर उड्डाणपुलावरुन ३० फूट खाली कोसळल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर लाखनी येथे २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. कंटेनर क्रमांक एन एल ०१/ ए एफ २९५० हा गुरुवारी रात्री सुरतवरुन प्लास्टिक दाण्याचे पोते घेऊन कोलकात्याकडे जात होता. लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावरून कंटेनर भरधाव जात असताना बस स्थानकाजवळ सर्विस रोडवर खाली कोसळला. यात कंटेनरचा उङ्मल्ल३ं्रल्ली१ चालक इकबाल इसाक खान (३०) बिजा ता. रामगड, जि. अलवर (राजस्थान) हा जखमी झाला. कंटेनर खाली कोसळल्यानंतर मोठा आवाज आल्याने लोकांची गर्दी जमली. पोलिसांनी धाव घेतली चालकाला केबिन बाहेर काढण्यात आले. त्याच्या डोक्याला गांभीर ईजा झाली होती. त्याला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *