सहसंचालक नागपूर आणि प्राचार्या आयटीआय तुमसर यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शासकीय औद्योगिक प्र-ि शक्षण संस्था, तुमसरचे प्राचार्या निता पिसे यांनी कर्मचान्यांसोबत अहंकाराने वागणे, सर्वांसमक्ष ओरडणे, दबाव टाकणे, पगार थांबविणे, विनंतीस मान न देणे, कर्मचाºयांचे सर्वासमक्ष अपमान करणे, उलट बोलणे, कोणत्या ना कोणत्या कारणाने वचपा काढणे, संस्थाप्रमुख असल्याने आपलीच मनमानी करणे ह्या सर्व बाबी शैक्षणिक क्षेत्रात प्रशिक्षणार्थ्यांसमोर अशोभनिय असुन त्यांचा संपुर्ण कारकिदीर्तील सेवाकाळ हा वादग्रस्त ठरल्याचे निदर्शनास येत आहे. प्राचार्या पिसे यांच्या अशा कार्यपद्धतीमुळेच शिल्पनिदेशक कै. योगेश दिनेश नगरकर यांनी नाईलाजास्तव आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत असुन जनमानसात तुमसर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रतिमा मलिन झालेली आहे. तसेच सहसंचालक नागपूर यांनीसुद्धा सदर प्रकरणात कै. योगेश नगरकर यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी प्राचार्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर यांचाच पक्ष घेतल्याचे पुराव्याअंती निदर्शनास येत आहे. एवढेच नसुन सहसंचालक नागपूर यांनी कै. योगेश नगरकर यांच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट येथे मे २३ च्या नियतकालीक बदलीकरिता ३

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *