साकोली उपविभागात अवकाळी पावसाची हजेरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार साकोली उपविभागात आज मंगळवारला सकाळी ९ वाजता नंतर लाखनी व साकोली तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाºयांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कापणी झालेल्या भातपिकासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या धानाच्या करपा पाण्यात सापडले आहेत या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकºयांची तारांबळ उडाली आहे. भात कापणी झालेल्या आणि मळणी सुरू असलेल्या शेतकºयाांचे यात मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील ३२५ हेक्टर तर साकोली तालुक्यातील अंदाजे ५० हेक्टर मधील शेत पिकांचे नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. लाखांदूर तालुक्यातील पाऊस परीस्थिती चा अहवाल अप्राप्त असल्याने माहिती कळू शकली नाही.

भंडारा जिल्ह्यात दि. २७ ,२८ आणि २९ नोव्हेंबरला हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून तीनही दिवसांसाठी जिल्ह्याला ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. शेतकºयांना पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान आणि कृषी विभागाने दिला होता.

त्यानुसा-र, शेतकºयाांनी आपली पिके झाकून ठेवली होती. मात्र काही शेतकºयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. साकोली तालुक्यात खरीप हंगामानंतर रब्बीच्या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. भात पिक ,तूर, वाल, भुईमूग, उडीद, मूग आदी पिकांबरोबरच वांगी, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, पडवळ, कारली आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे या लागवडीवरही परिणाम झाला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *