जिल्ह्यात अवकाळी पाऊस, पिकांचे मोठे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मंगळवारी दिवसभर झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेतामध्ये कापुन ठेवलेला धान पाण्याने भिजवला असून तुरीचीसुद्धा फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच भाजीपाल्यासोबतच फळबागांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झालेला होता. वातावरणामध्ये उन सावलीचा खेळ सुरू होता. कधी ढगाळ वातावरण, तर कधी मोकळं वातावरण सगळीकडे होता. सोमवारी सायंकाळपासुन ढगाळ वातावरण दिसुन येत होते अखेर मंगळवारी सकाळपासुन जिल्ह्यात रिमझीम पावसाने हजेरी लावली.हवामान विभागाने जिल्ह्याला येलो अलर्ट जाहिर केला आहे. मंगळवारी पहाटेपासुन पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने शेतकºयांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांच्या शेतांमध्ये कापनी केलेला धान पडुन आहे तो भिजल्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. तुरीला आलेली फुलेसुद्धा या पावसामुळे गळून पडली. भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फळबागांनासुद्धा मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसÞाने धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील शेतकºयांनी शेतामध्ये धानपिकाची कापनी केली मात्र मशीन अभावी धानाचा चुरणा होवु शकला नाही.त्यामुळे शेतामध्ये कापनी केलेला धानपी पडुन राहिला. त्यामुळे शेतकºयाचे मोठे नुकसान झालेले आहे. रबी हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून शेतकºयांनी आपल्या शेतात हरभरा, गहू पिकांची लागवड केली आहे. या पिकांनी जमिनीतूनआपले डोके वर काढले असतानाच अवकाळी पावसाने त्यावर घाला घातला. त्यात सर्व पिके जळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकºयांसमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या अवकाळी वादळी पावसाने भाजीपाला व फळबागांचे सुद्धा प्रचंड नुकसान केले असल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानाचे पंचनामे करण्याचे कागदी घोडे न नाचवता तत्काळ शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *