अखेर ‘त्या’ वादग्रस्त बांधकामावर भंडारा नगर परिषदेकडून स्थगिती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानीय तकीया वार्ड डॉ.चव्हाण यांचे हॉस्पिटलच्या समोर असलेल्या जागेवर प्लॉटच्या रजिस्त्रीपेक्षा जास्त जागेत बांधकाम करून खोटे दस्तावेज सादर करून नगर परिषदेच्या जागा हडपण्याचा प्रकार मालाधरी नामक येथील भू व्यवसायिकाकडून होत असल्याचे दिसून येत असता अनेकदा वृत्तपत्र आणि चॅनल वर बातम्या लागल्यानंतर नगरपरिषद ला सदर बाबीवर माजी नगरसेवक कल्पना राजकुमार व्यास यांनी जाब विचारला असता सदर बांधकाम थबविण्याचे आदेश नगर परिषदेच्या वतीने देण्यात आले. सदर जागेवर मालाधरी ने तकीया वार्ड येथील काही लोकांडून जागा विकत घेऊन तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स करता नगरपरिषद येथे प्रस्ताव मांडत ज्याची मूळ रजिस्ट्री २५०० चौ. फूट असून ४५००चौ. फूट च्या जवळ बांधकाम सुरू करून नगर परिषदेच्या गार्डन साठी संरक्षित असलेली जागा अधिकाºयांना पाठीशी घालत आर्थिक देवाणघेवाण करून लाखो ची जागा हदपुन त्यावर बांधकाम करण्याचा प्रकार सुरू करताच नगरसेवक कल्पना राजकुमार व्यास व परिसरातील नागरिकांनी याबाबतची तक्रार केली असता हा सर्व प्रकार अधिकाºाांच्या लक्षात आला.व आता आपल्या चुका सुधार करण्याच्या हेतूने सदर बांधकामावर स्थगिती आणीत नगर परिषदेच्या ओपन स्पेस वाचवण्यासाठी नगर परिषदेकडून प्रयत्न सुरू झाले .सदर प्रकरणी सामान्य नागरिकांची जागा वाचविण्यासाठी नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री.जाधव सर व राठोड सर उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी योग्य न्याय दिल्या बद्दल माजी नगरसेवक कल्पना राजकुमार व्यास यांनी दोन्ही अधिकाºयांचे आभार व्यक्त करीत अशा या नगरपरिषद च्या जागा हदपुन शासणाची दिशाभूल करणाºया भुव्यवसायिकावर कारवाही ची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.व यापुढे नगरपरिषद ची जागा कोणी हडपण्याचा प्रयत्न करेल त्यावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल असेही नगरपरिषद भंडारा च्या वतीने सांगण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *