सानगडी परिसरात हत्तीची एन्ट्री

साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सानगडी वनक्षेत्रात काल रात्री हत्तीच्या कळपाने एन्ट्री केली असून थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान केला आहे. काल रात्रीच्या सुमारास हत्तीचा कळप सानगडी वनक्षेत्रातील झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव गावाशेजारील शेत शिवारात झाली. शेतकऱ्यांनी शेतातील उभे धान पिक कापून त्याचे पुंजणे शेतात ठेवले होते. त्या पुंजणांची या हत्तीनी नाशधुश केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक राठोड, वनपरीक्षेत्राधिकारी संजय मेंढे, तहसीलदार कुंभरे व वनविभाग तथा महसूल विभागाची चमू सानगडी येथे आज तळ ठोकून आहे. हत्तीचा कळप नेमका गेला कुणाकडे याविषयी संशोधन सुरु आहे. तर महसूल व वनविभाग नुकसानीचे पंचनामे करीत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नरत आहे. हत्तीच्या एंट्रीमुळे या परिसरात भीती व त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हत्ती रात्रीच नुकसान करतात आणि दिवसा त्यांचे लोकेशन मिळत नाही. यामुळे वनविभागापुढे आव्हान आहे. शेतात खरीप पिकांसह आता नव्याने रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आज रात्री शोध मोहीम वनविभाग करणार आहे.यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कान्हेकर, कापगते, हटवार ,चाचेरे रामकृष्ण चांदेवार यांची ऊस वाडीअशी नुकसानग्रस्त झालेल्या ऊसधारक शेतकऱ्यांची आडनावे आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.