ओबीसी समाज जागृत झाला नाही तर येणारी पिढी माफ करणार नाही – माजी खासदार खुशाल बोपचे

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ (पात्री) वतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. ही रॅली शांतीवन बुद्धविहार इथून चकारा रोड, अड्याळ, सौंदळ पुनर्वसन, कोंढा कोसरा, चिचाळ मार्गे शांती बुद्ध विहारात रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रत्येक बुद्ध विहारात भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व या रॅलीचे समापन शांतीवन बुद्ध विहार (पात्री) येथे करण्यात येवून या ठिकाणी भारतीय संविधानाचे पूजन व भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर माजी खासदार खुशाल बोपचे व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते फीत कापून सम्राट अशोकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे म्हणाले की, ओबीसी बहुजन समाज वेळीच जागृत झाला नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही असे मार्गदर्शन करताना सांगितले. पुढे ते म्हणाले की, भारतीय संविधानाने आपल्याला परिपूर्ण अधिकार दिले असताना सुद्धा त्या अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यामुळे आपला ओबीसी समाज शिक्षण व नोकरी पासून येणाºया काळात वंचित राहणार आहे. त्यामुळे ओबीसी बहुजन समाजाने जागृत होण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

विचार मंचकावर हर्षदीप कांबळे यांच्या आई जोहर कांबळे व त्यांचे वडीलश्रीराम कांबळे, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, संजीव भांबोरे, सामाजिक कार्यकर्त्या निमाताई मोहरकर, पत्रकार सरिता जमनिक अकोला, विजयकुमार डहाट, सामाजिक कार्यकर्ते शंकर भेंडारकर, पृथ्वी शेंडे, पंकज वानखेडे, दिलीप घोडके, जीवन बोधी बौद्ध, धम्मरक्षित बौद्ध, सत्यफुला बौद्ध, सरिता बिलवणे पंचायत समिती सदस्य, सरपंच लोकमुद्रा वैरागडे, लिमचंद बौद्ध, विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून माजी खासदार खुशाल बोपचे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, जोहर कांबळे, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, पत्रकार संजीव भांबोरे, पत्रकार पंकज वानखेडे, तुळशीराम गेडाम, आशिष मेश्राम, मूर्तिकार राजकुमार वाहने, विजयकुमार डहाट, निमा मोहरकर, दिलीप घोडके, गणेश पारधी यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र पुष्पगुच्छ, शाल देऊन शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष जीवन बोधि बौद्ध, धम्मरक्षित बौद्ध, सत्यफुला बौद्ध, प्रणाली बौद्ध, अश्विन बौद्ध यांनी त्यांच्या सत्कार केला. सायंकाळी ९ वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीप पाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्रीकृष्ण देशभ्रतार, सामाजिक कार्यकर्ते प्रेमसागर गजभिये, कुलदीप गंधे, पत्रकार जयेंद्र चव्हाण, जनार्दन सुखदेवे, विपिन टेंभुर्णे, समाधान तिरपुडे, चिंटू अंबादे, बालक गजभिये, फोटोग्राफर निकेतन वानखेडे यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *