डॉ. रामचंद्र पाटील कांग्रेसचे नवे शहराध्यक्ष

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : मनमिळावू वृत्ती, दाट संपर्क व सार्वजनिक प्रश्नांची जाणीव ठेवणारे उच्च शिक्षा विभूषित डॉ. रामचंद्र पाटील यांची पवनी शहर कांग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असून सदर नियुक्ती ऐन निवडणूकीच्या तोंडावर झाल्याने पवनीच्या राजकीय वतुर्ळात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार सदर नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निदेर्शानुसार जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केली असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मोहन पंचभाई यांनी पक्ष बळकटीसाठी नवनियुक्त अध्यक्ष पाटील यांच्याकडून संघटन वाढविण्यासाठी यशोचित प्रयत्न करण्याचे अपेक्षात्मक आव्हान केले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देश्- ाकर व जिल्हा महासचिव धर्मेंद्र नंदरधने यांनी मावळते अध्यक्ष मनोहर उरकुडकर यांच्या पक्षासाठी असलेल्या कायार्ची प्रशंसा केली तसेच कार्यकत्यार्ना जोमाने कामाला लागण्याचे आव्हान केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचे समयोचित भाषणे झालीत. गांधी भवन जुना बस स्टँड पवनी येथे कांग्रेस पार्टीतर्फे कोजागिरी उत्सव साजरा करण्यात आला होता. दरम्यान डॉ. रामचंद्र पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी मोहन पंचभाई, डॉ. प्रकाश देशकर, धर्मेंद्र नंदरधने, प्रकाश पचारे, मनोहर उरकुडकर, शंकर तेलमासरे, कमलाकर रायपूरकर, प्रकाश भोंगे, अशोक पारधी, मकसूद खान, , शबाना बेग इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राकेश बिसने यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रामचंद्र पाटील यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *