देव्हाडा बु. बाजार असतो नेहमिच चिखलमय

भंडारा प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ शेजारी असलेल्या देव्हाडा बु. आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात रिमझिम पाऊसही झाला तरी बाजार संपूर्ण चिखलमय होऊन जाते. त्यामुळे वेळप्रसंगी आठवडी बाजार देव्हाडा-करडीसाकोली राज्यमार्ग क्रमांक ३५६ वर भरविण्यात आला होता. परिणामत: वाहतुकीची कोंडी होते. देव्हाडा बु. हे दर बुधवारी भरणारे पंचक्रोशीतील महत्वाचे आठवडी बाजार आहे. या बाजारात परिसरातील निलज बु., नवेगाव बु., मोहगाव, निलज खुर्द, जांभळापाणी, देव्हाडा खुर्द, नरसिंह टोला, माडगी व अन्य गावातील नागरिक खरेदीसाठी येतात. बाजार रामटेकगोंदिया राष्ट्रीय महामार्ग व तुमसरसाकोली राज्यमार्गांच्या संगमावरील चौकाच्या शेजारी भरतो. यामुळे या बाजाराला खूप महत्व आहे. येथे पावसाळा वगळता दार बुधवारी गुरांचा बाजारही भरतो. भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील तसेच लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील अनेक शेतकरी बैल खरेदीसाठी येथे येत असतात. त्यामुळे देव्हाडा बु. ग्रामपंचायतीला मोठा महसूल प्राप्त होतो. याचपैशाचा वापर करून बाजारात सिमेंट ओठे, स्वछतागृह, पाणी, वीज यांसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ग्रामपंचायतीचे आहे; पण मोजक्या सुविधा वगळता येथे सोयी-सुविधांची नेहमीच वानवा असते. अनेकदा येथील स्वछतागृहाच्या नळातून पाणी वाहत असते. त्यामुळे या बाजारात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ असल्याचे समजते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *