ॲमेझॉन कंपनीच्या कंटेनर मधून 23 लाखांचा माल लंपास

मानेगाव पेट्रोल पंपा जवळील घटना,कंटेनर चालकां विरुद्ध गुन्हा दाखल

लाखनी – राष्ट्रीय महामार्गावर मानेगाव वरील जवळील एचपी पेट्रोल पंपाच्या समोर ॲमेझॉन कंपनीच्या साहित्य भरलेल्या कंटेनर मधून 23 लाख रुपयाच्या किमतीचे साहित्य ड्रायव्हर व क्लीनर यांनी संगणमत करून लंपास केल्याच्या प्रकरण उघडकीस आला आहे याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार यातील कंटेनर नंबर HR 38 / AC 4825 चे चालक आरोपी साबीर युनुस खान वय 34 वर्ष रा. कोट ता. हातीन जि. पलवन राज्य हरियाणा , सलीम गफार खान वय 32 साल पत्ता कोट ता. हातीन जि. पलवन राज्य हरियाणा या दोघांनी ॲमेझॉन कंपनी तर्फे भरलेला माल भिंवडी मुंबई येथून प्लॉट नंबर 33 आणी 34 अर्जाव इंडस्ट्रीयल वेअर हाउस पार्क धानकुनी वेस्ट बंगाल येथे पोहचवण्या करीता मुंबईवरून धानकोलीकरिता निघाले असता राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव जवळील एच पी पेट्रोल पंपावर कंटेनर सोडून दिले.

दोन्ही ड्रायव्हर आरोपीतांनी संगणमत करून माल न पोहचवता आपले ताब्यातील कंटेनर मधील एकुन 48,55,977 रुपयाच्या सामाना पैकी कंटेनरच्या मागील बाजुचा ताला चे सील तोडुन ईलेक्ट्रानीक ब्युटी पार्लर, खेळणे तसेच ईतर घरगुती वस्तु असे एकुन 2941 सामान किंमती. 23, 19,833 रु.चा माल चोरी करून पसार झाले. या घटनेची माहिती कंटेनर मालक मनोज विजय त्यागी, वय 42 वर्ष, रा. फरिदाबाद हरियाना,यांना मिळतात त्यांनी लाखनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिल्याने आरोपी विरूध्द लाखनी पोलिसांनी अप क्र. 229/2022 कलम 381.34 भा.द.वी. सदरचा गुन्हा दाखल केला आहे.पो.नि. मिलींद तायडे पोलीस यांच्या मार्गदर्शनात पोहवा शालु भालेराव अधिक तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.