घरात घुसून पती-पत्नीवर रानडुकराचा हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर घराच्या मागील दाराला ठोकल्याचा आवाज येताच दरवाजा उघडला असता दरवाजा आड लपलेल्या रानडुकराने एका इसमासह त्याच्या पत्नीलाही गंभीर जखमी केल्याची घटना १० मे ला लाखांदूर तालुक्यातील बेलाटी येथे घडली.दोन्ही जखमी पती पत्नीला पवनी तालुक्यातील कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार बेलाटी येथील तुकाराम सुखदेवे व रत्नमाला सुखदेव हे राहत असलेल्या घराच्या मागील बाजूला रात्रीला दरवाजा थोकल्याचा आवाज आला असता टिकाराम सुखदेव यांनी दरवाजाउघडला.त्याच वेळी रानडुकराने प्रथम तुकाराम सुखदेव यांच्यावर हमला चढविला. त्यांनी आरडाओरड करताच त्याची पत्नी रत्नमाला सुखदेव या मदतीसाठी धावून आली असता तिच्यावरही रानडुकराने हमला केला.

घराचे समोरचे दरवाजे बंद असल्याने दोघे पती-पत्नींना बाहेर पडता आलं नाही. मात्र अधिकच आरडाओरड झाल्याने रानडुक्कर घरातून पळून गेला. सदर घटना शेजारच्या ना माहिती होताच त्यांनी दोघांनाही पवनी तालुक्यातील कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. सदर घटनेची माहिती लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकाºयांना मिळताच त्यांचे सहकाºयांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे.जखमी पतीपत्नी ला वनविभागाने आर्थिक मदत करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *