बाबाच्या शिकवणीमुळे सेवक सुखी झाला- लता बुरडे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी: महानत्यागी बाबा जुमदेवजीनी दिलेल्या शिकवणीनुसार चालणे महत्वाचे आहे. मानव धर्माच्या शिकवणीचा लाभ दु:खी सेवकांना झाला. त्यामुळे सेवक समाधानी आहेत. अंधश्रद्धा, व्यसनमुक्त समाज मानव धर्माच्या शिकवणीमुळेच दिसून येत आहे. मानव धर्मामुळे सरकारला आधार झाला. कांद्री येथे झालेल्या सेवक संम्मेलन मार्गदर्शन करतांना सांगितले की, बाबांच्या शिकवणीमुळे सेवक सुखी झाला असे कार्यक्रमाच्या उद्धाटीका आध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनी सांगितले. परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव जागृती संस्था कांद्री येथील सर्व सेवकांच्या व ग्रा.पं.कांद्री यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ९ वाजता महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.

आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ ला मानव जागृती, धर्म रक्षण सामाजिक विकास, व्यसन मुक्ती आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करुन देणारे गोरगरीब दु:खी मानवाला मार्गदर्शन करणारे मानव धमोचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या पुण्याईने बउद्देशीशिय प.पू.परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कांद्री येथील सर्व सेवकांच्या सहकार्याने भव्य सेवक सम्मेलन आणि भगवंताचे सामुहिक हवनकार्य करण्यात आले. बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ७ वाजता सामुहिक हवनकार्य, सकाळी ९ ते १२ वाजता शोभायात्रा, दुपारी १२ ते १२.३० वाजता दिप प्रज्वलन, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पं.स.सदस्य उमेश भोंगाडे यांनी केले. दुपारी १२.३० ते १ वाजता स्वागत समारंभ चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घघाटक आध्यामिक प्रमुख मानव धर्माचे लता दिलीप बुरडे यांच्या शुभहस्ते तर ब.उ.प.पु.प. एक सेवक मंडळ मोहाडीचे उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, सरपंच बैजू बंसोड, पोलीस पाटील प्रकाश तुपट तर प्रमुख पाहुणे ब.उ.प.पु.प.एक सेवक मंडळ मोहाडीचे सचिव मोरेश्वर सार्वे, संचालक गुरु शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, सहसचिव राजु पिलारे, संचालक एकनाथ जिभकाटे, राजु माटे, सरस्वता माटे, इंद्रपाल मते, प्रकाश निंबार्ते, संगणक चालक लक्ष्मण माहुले

, स्वप्निल बडवाईक, विजय निमकर, विनोद तांडेकर, विजय दमाहे, गोपाल धार्मिक, रामरतन नागफासे, बाबू भागरकड, मोरेश्वर भिवगडे, कवडू दिवटे, विलास चौधरी मोरेश्वर पिंगरे, अशोक भरे, मधुकर पटले, रामनरेश बोंदरे, जयपाल पटले दिनेश देशमुख, राजू भोयर, निळकंठ आतीलकर, दामोदर नेवारे, मुक्ता धुर्वे मदन कनोजे, रामकृष्ण कुकडे, सुंदरलाल कटरे, देवचंद सेलोकर, सुधाकर भेलकर, पुरुषोत्तम बावनकर उपासराव भरे यांची उपस्थिती होती. सत्कारपात्र कांद्री येथील जेष्ठ सेविका बेबी बाबुराव पिलारे, बाळकृष्ण हटवार, उत्कृष्ट स्वयंपाक करणारे सुरेश सहादेव पिलारे, बाळू ईनमाते, भगवान दुधपचारे यांचा शाल व श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी झाकीचे प्रथम बक्षीस परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बोंदरीकडून ६००१ रुपये रामरतन नागफासे जांब, दुसरे सहसचिव राजू पिलारेकडून ५००१ रुपये राम नरेश बोंदरे सुकडी, तिसरे सुभाष शिवरकरकडून ४००१ रुपये बोदरे देव्हाडी, चवथे नारायण जयदेव बालपांडेकडून ३००१ रुपये गौरी मानकर कांद्री, पाचवे गौरीशंकर मानकरक- डून २००१ रुपये परमात्मा एक सेवक खुटसावरी यांना देण्यात आले.

प्रोत्साहनपर मनोहर गलबलेकडून १००१ रुपये लेझिम ग्रुप गोवारीटोला यांना १००१ रुपये, ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मानवजागृती संस्था कांद्रीकडून १००१ रुपये अनिल आकरे लेझिम ग्रुप कांद्री यांना देण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत नामदेव निमकर, दयाराम देशमुख पुरुषोत्तम नान्हे, सुनील आकरे, सुभाष कुंभलकर, घनश्याम निमकर, प्रभू फटिंग, सत्यफुला डोणारकर, विजय निमकर, संगीता पिल्लारे यांनी केले. दुपारी ४ वाजेपासून महाप्रसादाला सुरवात झाली. सायंकाळी ५ वाजेपासून भजन कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजेपासून सास्कृतीक कार्यक्रम प्रस्तुत झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेश निखाडे, रामकृष्ण लेंडे, कार्तिक कुंभलकर, अमोल शेंडे, रामकृष्ण लेंडे, रोहित लोणारे, अमोल शेंडे, मारुती मेश्राम, राहुल पिल्लारे, विशाल चव्हाण, शामराव शेंडे, श्रीकृष्ण लेंडे, विष्णू उरकुडे, रमण नान्हे, हेमंत नान्हे, प्रवीण सेलोकर, शिशुपाल सेलोकर, सुनील परतेती, शामू मारबते, भोला भरे, राजू दिवटे, शुभम लेंडे, अतुल देशमुख, उद्देश पिल्लारे, आर्यन पिल्लारे, पप्पू बालपांडे, सुभाष शीवरकर, शंकर बारई, सचिन मानकर, रोशन बारई, मुकेश नान्हे, चंद्रशेखर कारेमोरे, ज्ञानेश्वर गलबले, श्रीकांत निरगुडे, प्रकाश गलबले, सुरेंद्र नान्हे, अंकुश बालपांडे, शुभम येलकरे, नितीन पिल्लारे, सुजित बुरडे, प्रवीण बारई, केतन गलबले, प्रकाश वंजारी, गौरीशंकर गिरिपुंजे, प्रशांत डोंगरे, ओमप्रकाश हटवार, दीपक येलकरे, शैलेश हटवार, शामस्वर पिलारे, संजय हटवार, देवानंद शिवरकर, सुभाष भिवगडे आदींनी परिश्रम केले. प्रास्ताविक भगवान पिलारे यांनी केले तर आभार सचिव युवराज गलबले यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *