धुलीवंदनाच्या दिवशी जोपासली जाते गरदेव यात्रेची परंपरा

यशवंत थोटे मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला तुमसर व मोहाडी तालुक्यातील होळीच्या पाडव्याला विविध रंगाची उधळण करून धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.हा सण साजरा करण्याची तन्हा प्रत्येक भागामध्ये निराळी आहे. देशातील व राज्यातील विविध भागांमध्ये अनेक परंपराही पाहावयास मिळतात. जिल्ह्यातील गरदेव यात्रा हीसुद्धा त्यातील एक. यंदा तीन वर्षांनंतर गरदेव यात्रेचा उत्साह कायम आहे. मोहाडी तालुक्यातील करडी येथील गरदेव यात्रा ही प्रसिद्ध असून यात्रेला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. मागील तीनवर्षे कोरोनाच्या संकटामुळे या यात्रेला ब्रेक लागला होता. यावर्षी मात्र भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे.

तुमसर-साकोली राज्यमार्गावर करडी पोलिस स्टेशन परिसरात धूलिवंदनाच्या दिवशी पटांगणात गरदेवाची यात्रा भरते. या पटांगणात एक लाकडी खांब उभा करून त्याला पूरक असा एक दुसरा खांब पंचेचाळीस अंशावर टेकून ठेवला जातो. ही दोन्ही खांब पूर्वी लाकडांची राहत होती. त्यांना मामा व भाचा म्हणून प्रतीक मानले जात होते. लाकूडतोडीवर बंदी आल्याने जंगलातून लाकूड आणणे बंद झाले. करडी ग्रामपंचायतीने पुढाकारघेऊन सिमेंट काँक्रीट व लोखंडाचे कायमस्वरूपी खांब तयार केले आहेत. पण परंपरा मात्र तीच कायम आहे. आधी या खांबांच्या वर एक जण एक मोठा दोर व आळा उभ्या खांबावर लावण्यात येणारा लाकडी खांब घेऊन पुजाºयांच्या स्वाधीन करतो.पुजारी त्यांची पूजा करून गर प्रारंभ करतात. मागील तीनवर्षांपासून कोरोना संसर्गामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनामुक्त झाली. पर्यावरण या प्रवासात विविध गाव-शहरांतील हजारो अडचणीत बसू शकेल एवढी जागा होती.

त्याखाली एक छोटेसे गरदेवाचे मंदिर आहे. धूलिवंदनाच्या दिवशी गरपूजनाच्या परंपरेनुसार येथील पुजारी हरिराम चाचिरे हे त्यांच्या दुपारच्या सुमारास घरी असलेले कुलदैवत गराच्या ठिकाणी घेऊन आणून पूजा करतात. नंतर ग्रामपंचायत कार्यालयाचा एक प्रतिनिधी याप्रसंगी परिसरातील पंचक्रोशीतून नागरिक जमा होत असल्याने मोठी जत्रा भरते. सुरक्षेच्या दृष्टीने करडी पोलीस स्टेशन ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात येईल. तसेच गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या आष्टी येथे मागील दिडशे वर्षापासून धुलीवंदनाच्या दिवशी गरदेवयात्रा भरते. भाविकांनी गरदेवाचे दर्शन घेतले. नवस मागितला त्यांनी दिलेले वचन पूर्ण केले.

लहान महादेव, मोठा महादेव, गेलेले कुटुंबही नंदीसह गरदेवसमोर दार ठोठावले. पूजा करून गावातील तीन पुजारी प्रचंड उंच लाकडाने बांधलेल्या भगवान गरदेवाच्या उंच शिखरावर गेले खाली उभ्या असलेल्या हजारो भक्तांसमोर चारही दिशांना वांग्याचेकिंवा वांगाचे चार तुकडे फेकले. ज्यांना तो तुकडा मिळाला ते भाग्यवान मानले जातात असे मानले जाते. मागीलवर्षी प्रथमच आमदार राजू माणिकराव कारेमोरे, जि.प.सदस्य राजू देशभ्रतार, ठाकचंद मुंगुसमारे यांनी यात्रेला भेट दिली होती. यात्रा समितीचे प्रमुख डॉ.अमृत सोनवणे, सरपंच ज्योती सचिन गेडाम, श्रावण गौपाले,यदुनाथ गौपाले, मूलचंद गौपाले, दिलीप गौपाले, हेमेंद्र गौपाले, रामा गौपाले, नाथू गौपाले, विजय राऊत, बालचंद नागपुरे,रुपा सोनवाणे, दीपचंद सोनवणे यात्राचे नियोजन करतात. सुरक्षेच्या दृष्टीने गोबरवाही पोलिस स्टेशनचे अधिकारी मदनकर व कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो.

जीवघेणा खेळ दोन खांबांवर आळा बांधल्यानंतर त्याला एक मोठा दोर बांधला जातो. या दोराला दोन व्यक्ती एकमेकांच्याविरुद्ध दिशेने हवेत झोके घेतात. हा एक खेळाचा प्रकार असल्याचे सांगितले जाते.हा खेळ जरी जीवावर बेतणारा असला तरी श्रद्धेपोटी जत्रेत येणारे अनेक भाविक हा खेळ खेळतात. विशेषत: तरुण मुलांमध्ये याचे आकर्षण मोठ्या प्रमाणात असते.यावर्षी कोरोनाचे प्रमाण कमी असल्याने ही यात्रा भाविकांनी फुलनार असल्याचे आयोजकांनी दैनिक भंडारा पत्रिकाला सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *