केसलवाडा फाट्यावर तपासणीच्या नावावर अवैध वसुली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : सध्या लाखनी शहरातून गेलेल्या उड्डाण पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु असून लाखनी वाहतूक पोलिसांकडून तपासणीच्या नावावर करण्याच्या बाबीकडे लक्ष न देता शहराच्या बाहेर असलेल्या केसलवाडा फाट्यावर उड्डाणपुला खाली यांचा धंदा तेजीत सुरु आहे. येथील ठाणेदार यांनी वाहतूक शिपायांना आॅनलाईन कार- वाहनचालकांकडून केसलवाडा फाटा वाया करण्याचे निर्देश दिले असले तरी परिसरात उड्डाण पुलाच्या खाली अवैधरित्या वसुली मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्या वाहतूक शिपायांचा रविवारचा दिवस तर त्यांच्यासाठी पर्वणीच असते. अनेक लहान मोठे शेतकरी आपले जवळील पाळीव जनावरे विक्रीसाठी भंडारा येथील प्रसिद्ध बाजारात नेत असतात त्यांच्याकडूनही जबरण वसुली केली जात आहे.

तेथे कर्तव्यावर असलेले वाहतूक शिपाई खुलेआमच वसुली करताना दिसून येतात हि बाब नागरिकांच्या लक्षात येते पण त्यांना बोलेल कोण? मागील काही महिन्यापूर्वी कर्तव्याचा आव आणून सर्विस रोडवर उभ्या असलेल्या काही वाहनांवर कारवाही केली होती. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना ती सुरळीत सवय जडलेल्या या शिपायांवर कारवाही करणार कोण? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दररोज सकाळ पासून केसलवाडा फाटा परिसरात या पथकामार्फत अवैध रित्या वसुली केली जात असून या वसुली करिता पोलीस ठाण्यातून २ वाहतूक कर्मचारी व १ होमगार्ड ची नियुक्ती केली असल्याची माहिती आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *