भिकाºयाच्या वेशात चोरी करणाºया आरोपीला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : घराचे बांधकाम सुरू असल्याने छतावर पाणी मारत असताना खुल्या घरातून सोन्याचांदीचा ऐवज व रोकड असा १ लाख २८ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना १५ जानेवारीला तुमसर (जि. भंडारा) येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरीचा तपास करीत आरोपीला चंद्रपूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. राम दयाल मानसिंग मोदी (३५, अमदा, खरसावा झारखंड) असे त्याचे नाव आहे. गिरीधर येरणे (श्रीरामनगर) यांच्या बहिणीच्या घराचे बांधकाम सुरू असताना त्या छतावर पाणी मारण्यासाठी गेल्या.

यावेळी चोरट्याने भिक मागण्याच्या बहाणा करीत घरात प्रवेश केला. यात ३ हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिणे असा १ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ठ पोलिस अधिकाºयांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांनी सांगितल्या प्रमाणे रेल्वे स्टेशन देव्हाडी, तिरोडा, गोंदीया, कामठी, इतवारी, नागपूर भागातील रेल्वे स्टेशनवरील सीसीटिव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला असता अन्य गुन्ह्यामध्ये तो चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजले. त्यामुळे तुमसरमधील पोलिसांच्या पथकाने चंद्रपुरात जावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला माल हस्तगत करून कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपरपोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, साहाय्यक पोलिस अधीक्षक रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्ष्- ाक निलेश ब्राह्मणे, सहाय्यक फौजदार धर्मेंद्र बोरकर, यांच्यासह मार्कंड डोरले, नितीन झंझाड, परीमल मुलकलवार, राजकुमार गिºहेपुंजे यांनी पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *