स्मार्टफोन चोरणाºया आरोपीला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावरून प्रवाशाचा स्मार्टफोन चोरणाºया चोरट्याला पकडण्यात आरपीएफ पोलिसांना यश आले आहे. सूरज रामविलास यादव (२५) रा. लोरमी, पोलीस स्टेशन मुंगेली, छत्तीसगड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप गिरधारी डोमडे (३०) रा. कंटगी जिल्हा बालाघाट २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कटंगी येथून गोंदिया स्थानकावर गोंदियाहून पुण्याला जाण्यासाठी आला आणि ट्रेन चुकल्यामुळे गोंदिया स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वर बसून झोपी गेला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या जॅकेटच्या वरच्या खिशात ठेवलेला त्याचा स्मार्टफोन कोणीतरी चोरल्याचे त्याला आढळले. प्रवाशाने जीआरपी गोंदिया येथे या घटनेची तक्रार केली. तेथे कलम ३७९ आयपीसी अंतर्गत गुन्हा क्रमांक ०२/२०२३ नोंदविण्यात आला. या घटनेची माहिती आरपीएफ गोंदियाला मिळताच प्रभारी निरीक्षक व्ही. के. तिवारी यांच्या सुचनेनुसार सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आणि अखेर संशयास्पद अवस्थेत सदर मोबाईल चोर सूरज यादव याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीला गेलेला स्मार्टफोन जप्त करून पुढील कारवाईसाठी जीआरपी गोंदियाकडे सुपूर्द करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक मयंक मिश्रा, हेड कॉन्स्टेबल आर. रायकवार, हेड कॉन्स्टेबल राहुल सिंग आणि डिव्हिजनल टास्क टीम कॉन्स्टेबल विकास पटले यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *