वाघाने पाडला तीन जनावरांचा फडशा

भंडारा पत्रिका गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडजवळील मुंडीपार जंगलात वाघाने तीन जनावरांची शिकार केल्याची घटना २ जानेवारी रोजी घडली. या घटनेमुळे मुंडीपार परिसरात दशहतीचे वातावरण आहे. सडक अर्जुंनी व अर्जुनी मोर तालुक्यात व्याघ्र प्रकल्प असून मागील काही दिवसात वाघ, बिबट आदी गावशिवारात शिरुन जनावरे व मानसांवर हल्ले केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. त्यामुळे जंगल परिसराला लागून असलेल्या गाव व शेत परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभाग उपाययोजना करीत असली तरी त्या अपुºया पडत असल्याने वन्यप्राण्यांचे हल्ले अद्यापही सुरु आहे. २ जानेवारी रोजी मुंडीपार जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांवर हल्ला केला. यात बीरी येथील शालीक डोंगरवार यांचा एक रेडा, भास्कर मेश्राम यांची गाय व चंद्रभान मेश्राम यांचा एक बछड्याचा वाघाने फडशा पाडला. घटनास्थळावर वाघाच्या पावलाचे ठशे आढळून आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *