सराफा व्यवसायींना लुटणाºया टोळीतील चार आरोपी ताब्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : आर्णी येथील सराफा व्यवसायी सुरेंद्र गावंडे यांना खोदकामात मिळालेले सोने कमी किंमतीत देतो म्हणून दरोडा टाकणाºया टोळीतील चार आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, इतर आरोपींचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले सराफा व्यवसायी सुरेंद्र गावंडे यांना ९ अनोळखी आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांच्याकडे खोदकामात मिळालेली सोन्याची नाणी आहेत. पाहिजे असल्यास कमी भावामध्ये देतो, असे आमिष दाखवून व दोन खºया सोन्याची नाणी दाखवली. तसेच इतर दीड किलो नाणी विक्री करण्याचा २० लाख रुपयांमध्ये सौदा केला. : तक्रारदाराचा विश्वास संपादन करून व त्यांच्या मित्रांना २० लाख रुपये नगदी घेऊन राष्ट्रीय महामार्गावर नांदगव्हाण शिवारात बोलावून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील २० लाख रुपये नगदी जबरीने हिसकावून नेले, अशी तक्रार महागाव पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार कलम ४२०, ३९५ भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी महागाव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार दिवसांत तब्बल २००० किमीचा प्रवास करून महागाव, कळमनुरी, नांदेड, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी तपास करून चार आरोपींना ताब्यात घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *