अनैसर्गिक कृत्यातील फरार आरोपीला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गायीवर लैंगिक अत्याचार करणाºया फरार आरोपीचे गोंदिया आरपीएफने मुसक्या आवळल्या. हसन खान रा. जामूल, भिलाई (छत्तीसगड) असे आरोपीचे नाव आहे. गोंदिया आरपीएफने मंगळवार, ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक ३ वर आलेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून आरोपी हसन याला अटक केली. आज, बुधवार ३१ मे रोजी आरोपी हसनला भिलाई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. छत्तीसगढ राज्यातील भिलाई जिल्ह्यातील जामूल येथील गृहनिर्माण मंडळातील भाड्याच्या घरात दिल्लीहून येथे आलेल्या हसन खान आपल्या नातेवाईकांसोबत राहतो. तो कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. आरोपी हसने २७ मे रोजी रात्रीच्या सुमारास एका गायीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. सदरहू चित्रफित सामाजिक माध्यमांवर सामायिक झाली.

हा प्रकार विविधसामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी कळताच या प्रकाराचा निषेध करून निदर्शन केले, तसेच त्या आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सामाजिक माध्यमांवर चित्रफित सामायिक होताच आरोपी हसन हा फरार झाला. आरोपी फरार झाल्याची माहिती भिलाई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सर्व पोलिस ठाणे आणि रेल्वे पोलिसांना दिली.

तो गोंदियाकडे जाणाºया गाडीत बसल्याची माहिती मिळाली असता गोंदिया आरपीएफच्या वरिष्ठ अधिका-यांनी सर्व रेल्वे गाड्यांची कसून चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. मंगळवार, ३० मे रोजी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये असल्याचे कळताच ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस येथील फलाट क्रमांक ३ वर येताच रेल्वे पोलिसांनी चौकशी असता आरोपी हसन गाडीत मिळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. माहिती पोलिसांना देण्यात आली आज बुधवारी भिलाईचे पोलिस गोंदियात दाखल होत आरोपी हसन खान याला ताब्यात घेतले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.