ट्रकच्या धडकेत शेतकºयाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दुग्ध उत्पादक शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरी तालुक्यातील भरेर्गाव फाट्यावर घडली. अनंतराम भदरू सलामे (५२) रा. भरेर्गाव ता. देवरी असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अनंतराम सलामे यांनी नेहमीप्रमाणे देवरी येथे दुध वाटप केल्यानंतर आठवडी बाजार करून ते दुचाकी क्रमांक एमएच ३५ झेड ६८४१ ने स्वगावी जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर भरेर्गाव फाट्याजवळ रायपूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव असलेल्या ट्रक क्रमांक एमएच १२ व्हीबी ७१९७ च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंदिया येथील वैद्यकीयमहाविद्यालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घरचाकर्त्या पुरूषावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *