सारस जोडप्याचा विजेच्या प्रवाहाने मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या कामठा परिसरात सासर पक्षांचा जोडपा मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोंदियातील परसवाडा/झिलमिली तलावांवर विदेशी पक्षी आणि दुर्मिळ सारस यांच्या जोड्या नेहमी दिसतात, मात्र आज एक सारस पक्ष्याच्या जोडप्याचा मृत्यू घटना समोर आली. असुन हे सारस पक्षीचे जोडपे ५ ते ६ वषार्ची असुन त्या मध्ये नर सारसची लांबी सुमारे ५ फूट ८ इंच आणि मादी सारस पक्षीही लांबी ५ फूट ४ इंच इतकी आहे. एकीकडे जिल्ह्यात सर्रास संवर्धनासाठी सातत्याने प्रत्यन सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दाखवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुठे तरी प्रशासन सारस संवर्धनाकडे दुर्लक्ष करते कि काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या सारस पक्ष्यांचे सुमारे ५ ते ७ दिवसांपूर्वी विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाला असावा असे अंदाज लावण्यात येत आहे. याची माहिती सारस पक्षी संवर्धन यांना मिळताच त्यांनी सारस पक्षी चे घटना स्थळावरच पशुवैधकीय यांना च्या मार्फत त्या दोन्ही सारस पक्ष्यांचे सविच्छेदन करून त्यांच्यावर अंतिमसंसार हि त्याच ठिकाणी करण्यात आले. वर्षानुवर्षे परदेशी पक्ष्यांसह सारस पक्षी मारले जात आहेत. विषबाधा अन्न, शिकार, विद्युत शॉक अश्या प्रकारे विदेशी पक्ष्यांचे हि प्रकरणे देखील समोर येत आहेत. सारस पक्षी संवर्धनावर लाखो रुपये खर्च करूनही सारस पक्षी असुरक्षित असल्याचे दिसत आहे. आज च्या या घटनेने जिल्ह्यात २०२२ मध्ये असलेली ३४ हि संख्या आता ३२ वर येऊन ठेपली आहे, ३ वर्षात दासगावात २, परसवाडा १ व पांजरा येथे १ सारस १ पक्ष्याचा मृत्यू झालेला होता आज पार्ट २२ डिसेंबरला दोन सारस पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *