अवैध दारु विक्री व वाहतूक जोमात; कारवाई मात्र शुन्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोरेगाव : अलिकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशान्वये अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याच्या कारवाईचा धुमधडाका सुरु आहे. मात्र, गोरेगाव तालुक्यात रात्रं-दिवस अवैध दारु वाहतुक व विक्रीही जोरात सुरु आहे. दारु बंदीचा निर्णय घेतल्यानंतर गावात अवैध दारुविक्री होत आहे. एवढेच नव्हे तर अवैध व्यवसायिक उलट पोलीस आमच्या संगतीला असा संदेशही देत आहे. त्यामुळे गोरेगाव पोलीस स्टेशनची हद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गोरेगाव तालुका जिल्ह्याचे केंद्र स्थान आहे. गोरेगावपासुन अवघ्या १५ किमीवर गोंदिया शहर आहे. तसा गोरेगाव तालुका घटना झ्र घडामोडीच्या दृष्टीकोनातून शांत मानला जातो. त्यामुळे पोलीस खात्यातही गोरेगाव पोलीस स्टेशनला शांत व गुन्हेविरहीतच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असावे. याच शिष्टाईचा आडोश्याखाली अवैध दारु विक्री जोरात सुरु आहे. अवैध दारू विक्रेत्यांना दारुचा पुरवठा करणाºयांचा गोरेगाव केंद्रबिंदु आहे. रात्रं-दिवस हव्या तेवढ्या दारुच्या पेट्या जड व दुचाकीने निर्भीडपणे पोहोचविले जाते.

गावागावात दारु पोहचत असल्याने अवैध दारु विक्रेतेही आपला व्यवसाय चांंगलाच फुलवित आहे.तेढा येथील नागरिकांनी दारुबंदी केली. मात्र नागरिकांच्या आवाहनाला धुडकावून अवैध दारु विक्रेते आपले काम सुरुच ठेवत आहे. याशिवाय गोरेगाव तालुक्यातील अनेक गावात दारुचा महापुर पहावयास मिळत आहे. यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. असे असतांनाही पोलीसांनी एकाही अवैध दारु विक्रेत्यांवर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे गोरेगावपोलीस स्टेशन जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे का? असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करीत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गोरेगाव तालुक्यातील अवैध दारु विक्रेत्यांचा गुप्त आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *