आमगांव येथील दोन पोलिसांना मारहाण, पाच आरोपींना अटक, प्रकरणातील एक पोलीस निलंबित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना गौण खनिज वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकांनी मारहाण केली असल्याची घटना रविवारीघडली होती. या प्रकरणातील एक पोलीस प्रवीण मेगरे याला गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी निलंबित केले आहे. आमगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस रात्र पाळीतील कर्तव्यावर असताना गौण खनिज वाहतूक करणाºया (मुरुम) भरलेले ट्रॉली पळून जात असताना त्यांना थांबवून मुरूम वाहतुकीचा परवाना मागितले असता आरोपींनी ते पोलीस असल्याचे माहीत असून ही आमगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना दोरी ने बांधून काठीने मारहाण केली व त्यांचा मोबाईल हिसकवला ची घटना रविवार रात्री घडलीहोती, या प्रकरणी पाच आरोपींना आमगाव पोलिसांनी केली अटक होती.

या प्रकरण चा पुढ़िल तपास आमगांव चे पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात शुरू होता. त्या तपासा दरम्यान मारहाण करनारे आरोपी सोबत घटना स्थली जाऊन चौकशी केली असता पोलीस हवालदार विजय चुनीलाल कोसमे याना आरोपी मारहाण करित असताना पोलीस शिपाई प्रवीण मेगरे यानी भीती पोटी घटना स्थळावरून पळ काढला होता. त्याच्यावर कर्तव्यावर असताना निष्काळजी पणा केल्याचा ठपका ठेवत त्याला निलंबित करण्यात आले आहे. घटना स्थळी असताना यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता. तर ही मारहाणीची घटना कदाचित टाळता आली असती, या पोलीस हवालदार ला मारहाण प्रकरणामुळे विभागाची बदनामी झाली असा पोलीस विभागाचा निष्कर्ष आहे. पोलीस शिपाई प्रवीण मेगरे याला निलंबित करण्यात आल्याचे पत्र आमगाव पोलीस स्टेशन ला पाठवून कळविण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस याची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *