वाहतुक शाखेने चालविला फटाका सायलेन्सरवर रोडरोलर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: कानठळ्या वाजविणाºया फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्नमुळे शहरवासीय चांगलेच वैगातले आहेत. अशात त्यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे वाहतूक नियंत्रण शाखेने असे ५८ सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त केले असून, मंगळवारी (दि. १२) त्यांच्यावर रोडरोलर चालविला. येथील जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर सायंकाळी शहरवासीयांच्या डोळ्यांदेखत हा प्रयोग करण्यात आला. शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. त्यातही काही बहाद्दर आपले वाहन काही वेगळे असावे व सर्वांना आकर्षूण घेण्यासाठी त्यात नवनवे जुगाड करतात. यामध्ये फटाका सायलेन्सर लावले जाते, तर कित्येक जण वेगवेगळे आवाज करणारे किंवा प्रेशर हॉर्न लावतात. असले वाहन रस्त्याने कर्णकर्कश आवाज करीत गेल्यावर मात्र नागरिकांच्या कानठळ्या वाजतात. सततच्या अशा आवाजाने तर डोकेदुखी होऊ लागते. या फटाका सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होतअसून, शहरवासीय अशा वाहनांमुळे पार वैतागले आहेत.

यामुळेच अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. शहरवासीयांची मागणी व त्यांना होणारा त्रास लक्षात घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर पर्वते यांनी त्यांच्या विभागाला अशा फटाका सायलेन्सर व प्रेशन हॉर्न असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यातूनच वाहतूक पोलिसांनी ५८ फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त केले होते. मंगळवारी (दि. १२) शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर या सायलेन्सर व प्रेशर हॉर्नवर रोडरोलर चालवून त्यांचा नायनाट करण्यात आला. नागरिकांत जनजागृतीचा उद्देश – फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे शहरवासीय चांगलेच वैतागले आहेत, तर आपल्या वाहनांमध्ये यांचा वापर करणाºयांसाठी हे आकर्षण वकमरवणुकीचे साधन बनले आहे. मात्र, यामुळे ध्वनिप्रदूषण होत असून, नागरिकांना त्यापासून त्रास होतो. अशात असे फटाका सायलेन्सर व प्रेशर हॉर्न लावणे नियमाविरुद्ध असल्याने कुणीही यांचा वापर करू नये व केल्यास त्याचे काय केले जाते हे दाखवून देत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी जनतेसमोर हा प्रयोग केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *