कत्तलखान्याकडे जाणाºया ४६ गोधनाची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्थानिक गुन्हे पोलिस पथकाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनीधाबे ते चुटिया चौक दरम्यान नाकाबंदी करुन कत्तलखान्याकडे जाणाºया ४६ गोधनाची सुटका केली. ही कारवाई १९ आॅगस्ट रोजी रात्री करण्यात आली. स्थानिक गुन्हे पोलिसांना नवेगावबांधकडून नागपूर कत्तलखान्याकडे गोधनाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पवनीधाबे ते चुटिया चौक दरम्यान नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान, एमएच ३१, सीव्ही ७२३८ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता ८ लक्ष रुपये किमतीची ४६ जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळले. पोलिसांनी जनावरे व ट्रक ताब्यात घेऊन मोहम्मद शोहेल मोहम्मद फारूख शेख (३५, रा. नागपूर), अब्दूल अशफाक अब्दुल अजीज कुरेशी (३५, रा. नागपूर) यांना ताब्यात घेते. याप्रकरणात फिरोज रा. नागपूर हा फरार झाला. ही कारवाई पोउपनि महेश विघ्ने, पोहवा तुलशीदास लुटे, प्रकाश गायधने, चापोशि कुंभलवार, पोशि. संतोष केदार यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *