सना खानहत्या प्रकरणात आणखी एकास अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सना खान खून प्रकरणात एकापाठोपाठ एक अटकेचे सत्र सुरु आहे. जबलपूर पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. आरोपीला जबलपूर येथूनच ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आरोपीची ओळख उघड झालेली नाही. त्याचवेळी या अटकेनंतर पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी सना खान यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाºया महेंद्र यादवला अटक केली होती. सना खान यांचा मृतदेह अजून सापडलेला नाही. अमित साहूला भेटायला त्या १ आॅगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. त्यानंतर १ आॅगस्टला त्यांच्यात भांडण झालं. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे तपासात अडथळे येत आहेत.

मात्र, महेंद्र यादव आणि राजेश सिंगला अटक केल्यामुळे बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे. सना खान खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित उर्फ पप्पू शाहू आणि त्याचा एक साथीदार राजेश सिंग याला जबलपूर येथून नागपुरात आणले आहे.काल पीसीआर संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ आॅगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मात्र, आरोपी सातत्याने आपला जबाब बदलत असून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी आरोपीने खून करून मृतदेह हिरेन नदीत फेकून दिल्याचे सांगितले होते. मात्र आता तो चौकशीत आणखी वेगळाच तपशील सांगत असल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *