रोजगार मेळाव्यात ६९ उमेदवारांना महावितरणच्या विद्युत सहाय्यकपदाची नियुक्तीपत्रे प्रदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोजगार देण्याच्या मोहिमे अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात महावितरणच्या वतीने नागपूर विभागातील ६९ उमेदवारांना विद्युत सहाय्यक या पदाची नियुक्ती पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.योगेश कुंभेजकर, उपायुक्त आशा पठाण, महा- वितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी संतोष शेगोकार, महानिर्मितीचे मुख्य अभियंता अभय हरणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यात नागपूर परिमंडलातील ३८, चंद्रपूर परिमंडलातील २२ व गोंदिया परिमंडलातील ९ उमेदवारांचा समावेश होता. महानिर्मितीच्या दोन तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या उमेदवा- रांनाही यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली. या रोजगार मेळाव्यात महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) शरदकुमार वानखेडे, अधीक्षक अभियंते अविनाश सहारे, अमित परांजपे, मानव संसाधन विभागाचे उप महाव्यवस्थापक रुपेश देशमुख, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते, कार्यकारी अभियंता राजेश घाटोले हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश कुंभेजकर यांनी केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. महावितरणच्या उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळताना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *