भरधाव ट्रेलरच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी खापा : कोळसा भरून अदानी पावर प्लांट तिरोडा येथे घेऊन जाणाºया भरधाव ट्रेलरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी झाली. हि घटना आज सायंकाळी ५.१५ वाजता तुमसर तालुक्यातील व मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील खरबी येथे घडली. बालचंद ठोंबरे वय ५५ वर्ष व वनिता भालचंद ठोंबरे वय ५० वर्ष राहणार वरठी. असे मृतकाचे नाव असून नलू दामोदर बडवाईक वय ४७ वर्ष राहणार खरबी असे जखमी महिलेचे नाव आहे.

बालचंद ठोंबरे हे तुमसर रोड येथे शासकीय नोकरीवर आहेत. ठोंबरे परिवार हे देवदर्शन मध्यप्रदेश छत्तीसगड येथील देवदर्शनाला गेले होते आज सकाळी ते गावी आले होते व आज मुलाच्या सासुरवाडीला नातेवाईकांना भेटण्याकरिता खरबी येते येत होते रस्त्याच्या बाजूला उभे असताना भंडाराकडून भरधाव वेगाने येणाºया ट्रक क्रमांक एम एच ४० सीडी ४७ ३७ नेमोटार सायकल क्रमांक एम एच ३६ एल ६५३४ ला जोरदार धडक दिली त्यात पती-पत्नी जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्या जखमी महिलेला तुमसर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. त्या महिलेच्या मागील मानेवरील हड्डी तुटल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती खरबी येथील कर्तव्यदक्ष उपसरपंच रवी बडवाईक यांनी तात्काळ मोहाली पोलीस स्टेशनला दिली मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुलरवार हे आपल्या कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले .परंतु मृतकाच्या. नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिल्यामुळे वातावरण एक तेदोन तास चिरखडत होता.वाहतूक थांबली होती घटनास्थळी तुमसर मोहाडी चेआमदार राजू कारेमोरे, मोहाडी.चे पंचायत समिती सभापती रितेश वासनिक व माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट दिली. घटनास्थळी. मोहाळी पोलीस स्टेशनचे कर्मचाºयासह तुमसर चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धंदर व पोलीस उपनिरीक्षक विजय गोमलाडू तसेच वाहतूक शाखेचे कर्मचाºयासह घटनास्थळी होते कोणते अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दोन्ही मृतदेह पोस्ट मॅडम करण्याकरिता शासकीय रुग्णालय मोहाडी येथे पाठवण्यात आले आहे.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात!

तिरोडा येथील विद्युत पॉवर प्लांट मध्ये नागपूर इथुन भंडारा किंवा रामटेक मागार्ने दररोज कोळशाच्या टिप्परची वाहतुक होत असते.जानेवारी २०२३ पासुन सुरक्षा रक्षकाचे वाहन बंद असल्याने या कोळशांची वाहतुक करणाºया वाहनांवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.कोळशाची चोरी,डिझेल चोरी,अनियंत्रीत वाहतुक, अवैध वाहतुक यावर नियंत्रण ठेवणे यासह नशा करून वाहन चालविणे आदिंची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे सुरक्षा रक्षक वाहन करीत असते.मात्र जानेवारी २०२३ पासुन सदर वाहन बंद असल्याने यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याने आजचा हा अपघात झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देशात अदानी यांचे मोठ-मोठया राजकीय नेत्यांशी विशेष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अगदी जवळचे संबंध असल्याने अदानी विद्युत पॉवरप्लांटसंदर्भात कुणीही एक शब्दही बोलायला तयार नाही.आज अपघातात ज्या ठोंबरे कुटूंबियांचा आधार हिरावला त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी कोण पुढे येणार प्रशासनाने भंडारा-तुमसर-बालाघाट महामार्ग मागील दोन वर्षापुर्वी राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषीत केला.मात्र अद्यापही त्याचे काम सुरू झालेले नाही.अरूंद रस्त्यामुळे या मार्गावर मोठया प्रमाणात अपघात होत असुन त्याकडे शासन व प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत .तरी शासनाने भंडारा-तुमसरबालाघाट या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम तात्काळ करावे अशी मागणी बीआरएस नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *