जपानमधून प्रचंड गुंतवणूक येणार!

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा दिवसांच्या जपान दौरा आटोपून शनिवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. मुंबईत आल्यावर प्रसन्न वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबई विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जपानमधील अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानसोबत जे उत्कृष्ट संबंध प्रस्थापित केले, त्यामुळे जपान मोठ्या प्रमाणात भारताला सहकार्य करीत आहे. राज्य अतिथी म्हणून मला जपानने निमंत्रित केले होते. या दौºयात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार, विविध कंपन्यांच्या अधिकाºयां सोबत बैठका झाल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *