पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाची महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके जाहीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला (सांघिक सुसंवाद विभाग) पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अ‍ॅन्ड पीआर, ब्रँडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले आहे. पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील सर्वोत्तम संस्था आहे.

भारतातील विविध राज्यांत तसेच संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका आदी देशांतही सोसायटीच्या शाखा आहेत. नवी दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरमध्ये २५ ते २७ नोव्हेंबरला होणाºया आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या उदघाटन समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महापारेषणच्या जनसंपर्क विभागाची विविध पुरस्कारासाठी निवड करताना अधिकारी व कर्मचारी यांच्या अंतर्गत (कल्ला३ी१ल्लं’) व बहिर्गंत (ए७३ी१ल्लं’) संपकार्साठी केलेले उपक्रम, महापारेषण समाचार या गृहमासिकात (ऌङ्म४२ी टँ्रल्ली) केलेले डिजिटल बदल, क्यू-आर कोड, पॉडकास्टचा सकारात्मक पध्दतीने वापर केला आहे. नागरिकांनी उच्च दाब वीजवाहिनीची काळजी कशी घ्यावी, तौक्ते व निसर्ग चक्रीवादळात महापारेषणच्या अधिकाºयांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी, महापारेषणने ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात अखंड वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी ही फिल्ममध्ये अ‍ॅनिमेशनचा वापर करून दाखविली आहे.

या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच महापारेषणचे व्हॉटसअप बुलेटिन, आॅडिओ-व्हिज्युअल्स बुलेटिन, व्हॉटसअप चॅनेल, सोशल मीडियाचा सकारात्मक पध्दतीने जनसंपकार्साठी वापर, केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजना, उपक्रम, अभियान सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले. केंद्र शासनाच्या ैउज्ज्वल भारत; उज्ज्वल भविष्यै या अभियानात ऊर्जा विभागाने केलेली कामगिरी, मराठी भाषेचा जागर, पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या विद्यार्थ्यांशी वातार्लाप, विविध प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात महापारेषणची भूमिका विषद करण्यात आली. महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने क्यू-आर कोडच्या माध्यमातून नोकरभरतीच्या जाहिराती डिजिटल स्वरूपात केल्या. डिजिटल ई-न्यूजलेटर μिलपबुकच्या स्वरूपात मांडले. पॉडकास्टच्या माध्यमातून आधुनिक संवाद ही संकल्पना राबविणारी महापारेषण ही पहिली कंपनी ठरली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *