अमरावतीत लहान मुलांच्या अतिदक्षता विभागाला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागाला रविवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आग लागली. सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून दोन मुले किरकोळ जखमी झाली आहे. अन्य मुले सुखरूप आहेत. थोडक्यात मोठी घटना टळली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिदक्षता विभागात अचानक धूर जमा व्हायला लागल्याने घटना लक्षात आली. उपस्थित डॉक्टर व कर्मचाºयांनी तातडीने पावले उचलत कक्षातील मुलांना सुरक्षित स्थळी हलविणे सुरू केले. दरम्यानच अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती देण्यात आली. सुदैवाने अग्निशमन विभागाचे केंद्रही जवळच होते. तातडीने अग्निशमन विभागाचे पथक दोन बंबांसह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. तत्पूर्वीच मुलांना सुरक्षित कक्षात ठेवण्यात आले. सर्व मुलांची तपासणी करण्यात आली असून दोन मुले किरकोळ जखमी आहे. अन्य सर्व मुले सुरक्षित आहेत. आता या मुलांना डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. आग लागल्याचे लगेच लक्षात आले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. स्त्री रुग्णालयातल्या डॉक्टरांनी व कर्मचाºयांनी समय सुचकता दाखवून तातडीने पावले उचलली. वरिष्ठ अधिकाºयांसह लोकप्रतिनिधीनी घटनास्थळी भेट देत आहे. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.