आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागातर्फे मोहल्ला कमेटीची बैठक संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आगामी नवरात्र, दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासना तर्फे दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यात मोहल्ला कमेटीची बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी स्वत: जवाहर नगर पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलपंप ठाणा येथील मधुबन सभागृह येथे आयोजित मोहल्ला बैठकीमध्ये उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर नगर येथे नवीन मोहल्ला कमेटीची स्थापन करण्यात आली .त्यामध्ये इंद्रजीत कुर्जेकर यांची नवनियुक्त अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली. यावेळी महिला सुरक्षा समिती, पोलीस पाटील व दुर्गा मंडळ यांची पोलिस अधीक्षक श्री.मतानी यांनी स्वत: बैठक घेऊन येणारे उत्सव, सायबर गुन्हे, महिलांची सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुले पळविनाºया टोळीच्या अफवांपासून सतर्क राहण्याबाबत देखील सुचना दिल्या. बैठकीत जवळपास शंभर नागरीकांची उपस्थितीत होती. जिल्हयातील संपुर्ण पोलीस स्टेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या मोहल्ला कमीटीच्या बैठकीला मोठया प्रमाणात नागरीकांचा उत्फुर्तपणे सहभाग दिसुन आला.यावेळी पुरुषांबरोबर महिलांची देखील उपस्थिती लक्षणीय होती. सदर बैठीला मोहल्ला कमीटीचे सदस्य व नागरीकांच्या उपस्थितीत विवीध विषंयावर चर्चा करण्यात आली. ज्यात आगामी सण उत्सव शांतते पार पाडावे, जातीय सलोखा निर्माण व्हावा, मिरवणुकी शांतत निघाव्या इत्यादी सुचनांचा समावेश होता. काही पोलीस स्टेशन स्तरावर ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने चोरी व घफोडीवर अंकुश कसा बसवीतायेईल याचे प्रात्यक्षीक करण्यात आले. गावात कौटुंबिक, दिवाणी स्वरुपाच्या कारणांवरुन घडणाठया गुन्ह्यांमध्ये समोपचाराने तोडगा काढणे, अवैध व्यवसायांवर आळा घालणे, गुन्हेगारीवर चर्चा करतांना विशेषत: सायबर गुन्ह्यावर भर देण्यात आला. यावेळी बैठकाला उपस्थित नागरीकांच्या अडचणी जाणुन घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *