गरबा म्हणजे ईश्वराप्रती आदरभाव व्यक्त करीत त्याच्यात तल्लीन होणे होय!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय जीवन दर्शन म्हणजे एक परिपूर्ण अनुभूती आहे. या जीवनाचे एक अंग म्हणजे नृत्य होय. हे नृत्य केवळ पदविन्यास अथवा अंगविक्षेप नसून ईश्वराप्रती आदरभाव व्यक्त करीत त्याच्यात रममाण होणे होय. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवात गरबा हा नृत्यप्रकार आता देशाच्या बहुतेक भागात लोकप्रिय झाला आहे. गरबा हे नृत्य उषाने पार्वतीकडून शिकले. याला लास्यनृत्य असेही म्हणतात.नंतर उषाने हे नृत्य सौराष्ट्रातील गोपींना शिकविल्याची आख्यायिका आहे. आता उषा कोण आहे? उषा ही कृष्णाची नातसून म्हणजेच प्रदूम्नचा पूत्र अनिरुद्धची पत्नी. तर उषा ही बळीपूत्र बाणासुराची कन्या होय. अनिरूध्दचे उषावर मन जडले होते. दोघांचे प्रेमसंबंध कळताच बाणासुराने अनिरुद्धला तुरूंगात टाकले. नंतर कृष्णाने बाणासुराचा वध करून अनिरूद्धची सुटका केली आणि उषाला व्दारकेला आणले. सासरी आल्यानंतर पार्वतीकडून शिकलेले नृत्य गोपिकांना शिकविले. असा गरबा नृत्याचा इतिहास आहे.

भारतीय संस्कृतीमधील सण, उत्सव हे पृथ्वीवरील वातावरण, बदलणारे ऋतुमान, त्यानुसार शरीराला आवश्यक असणारे बदल आदी बाबींशी मिळतेजुळते आहेत.पावसाळा गेला की वातावरणातील गारवा वाढत जातो. हा गारवा सहन करण्यासाठी ऊर्जा वाढवणे आवश्यक असते. त्यामुळे खाण्यात जसे बदल करण्यात येतात. तसेच शरीराला अधिक श्रमांची सवय लावावी लागते. या विचारातून गरबा नृत्यासह नऊ दिवस देवीची अर्थात शक्तीची उपासना केली जाते. गरबा म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील घट होय. जसे घट पूजले जातात तसे गुजरातमध्ये गरबा पूजतात. मातीच्या सजविलेल्या मडक्याला काही छिद्रे पाडलेली असतात आणि त्यामध्ये दिवा ठेवला जातो. हा गरबा म्हणजे ब्रम्हांड आणि प्रकाशमान झालेली छिद्रे म्हणजे नभांगणातील तारे होय. दिवा म्हणजेच उजेर्चा स्त्रोत आहे. सारे विश्व एकाच तत्त्वापासून तयार झाले आणि ऊजेर्चे हे तत्त्व साºया सृष्टीत सामावले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.