व्यसनी पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीला अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : वडिलांकडून शेतीच्या हिस्स्यासाठी पत्नीला मारहाण करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया पतीविरोधात पवनी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. वसंता तुळशिराम ईटाणकर रा. शिवनाळा ता. पवनी यांची मुलगी स्नेहा हिने २६ फेब्रुवारी रोजी २०२० रोजी पवनी येथील आझाद चौकातील राहुल कावळे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. लग्नाचे काही दिवस गेल्यानंतर पती हा व्यसनी होवून दारु पाणी पिऊन स्नेहाला आईवडीलांकडून शेतीचा हिस्सा मागण्यासाठी मारहाण करीत होता. याबाबत वसंता ईटाणकर यांनी आपल्या जावयाची समजूत सुद्धा काढली होती.
पण त्याचा काही फायदाझाला नाही. फेब्रुवारी रोजी वसंता ईटाणकर यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने मुलगी, जावई व नातीन हे मंडप पूजन कार्यक्रमाला घरी पाहुणे म्हणून आले. तिथे दोघा पती – पत्नीचे भांडण झाल्याने पती राहुल कावळे याने स्नेहच्या कानशिलात लावले होते. स्नेहाला वारंवार मारहाण करुन पतीने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत वसंता ईटाणकर यांच्या तक्रारीवरुन पवनी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला पवनी पोलिसांनी अटक केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *