श्री स्वामी समर्थ जयघोषाने भंडारा नगरी दुमदुमली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र, सहकार नगर (बालपूरी देवस्थान) येथे दि. १२ ते १८ एप्रिल २०२३ पर्यंत श्री स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह सुरू आहे. दु:खी, विवंचित, दीन-हीन, उपेक्षित निराधारांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाप्रसाद, पाठिंबा मिळून त्यांच्याही जीवनात सुख, समाधान, अध्यात्म, आनंद निर्माण करणे हे सेवेकºयांचे आद्य कर्तव्य आहे. या करिता पुण्यतिथि सप्ताहाचे औचित्य साधुन ग्राम अभियाना अंतर्गत रविवार दि. १६ एप्रिल २०२३ ला श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. पालखी सोहळ्यात भंडारा शहरातील सर्व जातीचे, धर्माचे, पंथांच्या लोकांनी सहभाग घेतला. संध्याकाळच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ पालखी सहकार नगर बालपूरी देवस्थान, भंडारा येथून निघून सहकार नगर, लोकवाणी चौक, गुर्जर चौक, बजरंग चौक, प्रेरणा बूक डेपो, मुखर्जी वार्ड, गांधी चौक परिसर, जलाराम चौक, रिद्धी सिद्धि मंदिर, खांबतलाव परिसरातील हजारो नागरीकांनी स्वगृही पालखीचे रांगोळी टाकून स्वागत व पूजन करून आशिर्वाद प्राप्त केला.

डॉ. मुखर्जी वार्डात गणेश मंदिर येथे नागरिकांच्या माध्यमातून रांगोळी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याठिकाणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. बजरंग चौक, मुखर्जी वार्ड व वीर सावरकर परिसरातील नागरीकांनी भक्तगणांना सरबत वितरीत केले. सदर स्थानांवर बालकांवर संस्काराचे, भारतीय संस्कृती व अस्मिता, मावनी समस्यांचे निराकरणासाठी नि:शुक्लप्रशोत्तरी, वास्तुशास्त्र याविषयीचे संक्षीप्त मार्गदर्शन करण्यात आले. पालखीच्या रस्त्यावर नागरिकांनी रांगोळी व सजावट केली होती. व रस्त्यावर नागरिकांनी उपस्थित राहून पालखीचे स्वागत व दर्शन घेतले. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग हा ज्ञानदीप प्रज्वलित करणारा, नैतिक आचरणातून, सदाचारातून, सहज सोप्या आध्यात्मिक उपासनेतून, सेवेतून समस्यांचे समाधान मिळवून देणारा राजमार्ग आहे. केवळ वैयक्तिक उत्कर्ष, सुख, अष्टैश्व र्य इत्यादींच्या विचाराने प्रेरित होऊन सेवा न करता राष्ट्रोत्कर्ष, सदभावना ‘सर्व मंगल मांगल्ये’ च्या विचारातून मनाची जडणघडण करावी, म्हणजे सुविचारातून सर्वत्र उत्तमच उत्तम घडेल. सामाजिक बांधिलकी, राष्ट्रोत्कर्ष, मानवकल्याण ही मुलभूत तत्वे अंगिकारल्यास अशक्य प्राय: गोष्टी सहज शक्य होतात. ‘श्री स्वामी समर्थ महाराज’ पूर्ण दत्तावतार असून श्री साई बाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज (शेगाव), श्री जंगली महाराज (पूणे), श्री माळी महाराज (पूणे) अशा अनेक संतांचे गुरू होते. इ.स. १८५६ मध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून २२ वर्षे सर्व जे-जे भेटलेत्याला दु:खमुक्त करून स्वयंभू बनविले.

संस्कृती सदाचार याविषयीचे मुळ विचार मांडले. जात-पात-धर्मपंथ यापलीकडे जावून मानवसेवेचे कार्य आजही तितक्याच वेगाने देशात व जगभरात परम पुज्य श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनात दिंडोरी प्रणित १५०० पेक्षाही जास्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमधून बालसंस्कार, भारतीय संस्कृती व अस्मिता, वास्तुशास्त्र, प्रनोत्तरी, कृषी, विवाह संस्कार, याज्ञिकी, ग्राम अभियान अशा १८ विभागामार्फत आजही सुरू आहे. पालखीच्या यशस्वी आयोजना साठी , केंद्र प्रतींनिधी विजया कायते, निशीकांत भेदे, प्रविण पडोळे, सारंग इंगोले, सचिन लेदे, अनिकेत इलमे, अभिषेक दलाल, श्री. खोपे दादा, सौ. वर्षा पंचबुध्दे, श्रीमती चैताली घरडे, सौ. मलेवार, नितिन कावळे, श्री चंन्ने, विकास झलके, सौ. माया कावळे, विना बडवाईक, मधुरा मदनकर, अमित फाये, अजय ब्राहमनकर, ममता बावणे, अभिलाषा चेटुले, शकुंतला सेलोकर, कळंबे काकू, श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्राच्या सर्व गुरू माऊलींच्या भक्त गणांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *