अअववध्धा जजन्नाााववरर त्तास्स्ककररीीववरर प्पाववन्नाीी पोलिसाची मोठी कारवाइ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : बाह्य जिल्ह्यातून पवनी तालुक्यात अवैध जनावरे तस्करी होत असल्याची माहिती पवनी पोलीसांना होताच धाड टाकून मोठी कारवाई केल्याची घटना बुधवारला सकाळी घडली. सदर कारवाई मोजा धानोरी येथील शेतशि वारात करण्यात आली असून यातील आरोपी शिरसाळा येथील गौशाळेचा संचालक असल्याचे कळते. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी सापडलेली जनावरे ही संगोपनासाठी कुरखेडा येथून पवनी तालुक्यातील गोशाळेत रवाना करण्यात आली असताना तिथे पोहोचण्यापूर्वी धानोरी गावच्या शेत शिवारात सोडण्यात आली. ही जनावरे जवळपास १०० असल्याची माहिती हाती आली असून यातील अंदाजे ३० जनावरे दगावल्याचे समजते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे. शासनाचा गौहत्याबंदी कायदा असून देखील दिवसेंदिवस जनावर तस्करीचे प्रमाण वाढत आहेत. मागील काळात पवनी पोलिसांनी अशीच कारवाई केली होती. यात आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. धानोरी येथे केलेल्या कारवाईत सुद्धा हाच आरोपी प्रमुख सूत्रधार असल्याचे कळते. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहाटे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.