पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणाºया शेतकºयांची आर्थिक लूट थांबवा – पंचभाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : खरीप पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणा-या शेतकरी सभासदाला केन्द्र शासन ३ टक्के व डॉ. पंजाबराव देशमुख ब्याज सवलत योजनेअंर्तगत ३ टक्के व्याज सवलत देत असल्याने (रु.३.०० लक्ष पीक कर्ज रक्कमेपर्यंत) शुन्य टक्के व्याज सवलतीचा लाभ कर्ज वसुलीचे वेळेस देण्याची प्रथा प्रचलीत आहे. परंतु दि. २६.२.२०२४ ला वि. भंडारा डिस्ट्रीक सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बैंक लि. भंडारा यांनी पत्र काढून मा. सहकार आयुक्त पुणे यांच्या दि. १३ फेब्रुवारी २०२४ च्या पत्राचा संदर्भ देत खरीप हंगाम २०२२-२३ चे मुदतीत करण्यांत आलेल्या कर्ज परतफे- डीच्या निकषावर केन्द्र शासनाकडून प्राप्त होणा-या ३ टक्के व्याज व डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत प्राप्त होणा-या ३ टक्के व्याज परताव्याचे प्रस्ताव केन्द्र शासनाच्या फसल रित पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश प्राप्त झाले असून सन २०२३-२४ पासून कर्ज परतफेडीचा निकषावर प्राप्त होणा-या ६ टक्के व्याज परताव्याची रक्कम डिबीटी व्दारे मुदतीत कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांच्या बचत ठेव खात्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थानी सन २०२३-२४ चे चालु पीक कर्ज मुदतीत परतफेड करणा-या शेतकरी सभासदांना शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ न देता शेतक-याकडूल मुद्दल रक्कमेसह ६ टक्के दराने व्याजाची रक्कम वसुल करण्याचे चुकीचे आदेश काढले आहे.

ज्या शेतकºयांनी २०२३ – २४ चे हंगामाची पीक कर्ज वसुली भरली आहे अशा सभासदांशी संपर्क साधून व्याजाचा भरणा काढून घ्यावा व जे सभासद व्याजाचा भरणा करणार नाही अशा सभासदांचे पुढील हंगामी वर्षात जबरदस्तीने व्याज वसूल करावे असा शेतकºयांना धडकी भरवणारा आदेश का- ढून आधीच कर्जबाजारी व नापिकिने त्रस्त असणाºया शेतकºयांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा आदेश शासनाने काढला आहे.त्यामुळे हा आदेश तात्काळ मागे घेऊन जिल्यातील शेतकºयांना न्याय द्यावा या आशयाचा निवेदन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केला आहे. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई,धनंजय तिरपुडे, बाळा ठाकूर,प्यारेलाल वाघमारे, योगराज झलके,राजेश हटवार,पवन वंजारी, विनीत देशपांडे,कमलेश चौहान, विनोद जगनाडे, प्रकाश देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *